अकोले
एक आदर्श शिक्षक, अकोल्याचे माजी तालुका शिक्षक म्हणून व गरिब विद्यार्थ्यांचे पालनकर्ते ,जिल्हा परिषदेकडून आदर्श शिक्षक म्हणून गौरविलेले गोविंदराव आनंदराव नाईकवाडी ( गुरुजी ) यांचे दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी ते ९३ वर्षाचे होते. त्यांचे निधनाने असंख्य विद्यार्थी, परिवार यांना दुःख झाले आहे.
साधी राहणी, शिस्तबद्ध जीवन, उत्तम चारित्र्य-सचोटी , सतत पायी प्रवास, शाळेतील वक्तशीरपणा, गरीब विद्यार्थ्याप्रति आपुलकी - प्रेमभाव, व्यवसायावरील गाढ निष्ठा अशा कितीतरी गोष्टी आपल्या आयुष्यात जपत एक सर्वांगसुंदर आदर्श त्यांनी निर्माण केल्याची भावना त्यांच्या सर्वस्तरातील लोकांकडून व्यक्त होत आहे.
देवठाण, इंदोरी, साकीरवाडी आदी गावांत शिक्षक म्हणून काम करताना आपल्या कामातून कित्येक पिढ्या स्मरणात ठेवतील, असे काम नाईकवाडी गुरुजींनी उभे केल्याचे दिसून येते. आपल्या सबंध जीवनात सामाजिक व शैक्षणिक कामाबरोबरच आपल्या नातलगांनाही मायेचा आधार देऊन आपली कुटुंबातील जबाबदारी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पार पाडली.
डॉ. अरुणकुमार नाईकवाडी ,प्राथमिक शिक्षक बँकेचे सेवानिवृत्त कार्यकारी संचालक शिवाजी नाईकवाडी यांचे ते वडील होते. त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुले ,चार मुली, जावई,सुना, बहिणी,नातवंडे, पतवंडे असा खूप मोठा परिवार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...