उस तोडणी कामगारांला रोजगाराची आशा जिवावर बेतली - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

रविवार, ११ एप्रिल, २०२१

उस तोडणी कामगारांला रोजगाराची आशा जिवावर बेतली

ऊसाचा ट्रॅक्टर पलटी होऊन चालक जागीच ठार .

 

टाकळी मानुर / प्रतिनिधी

 

पाथर्डी तालुक्यातील पूर्व भागातील टाकळी मानुर तांबेवाडी, गाडेवाडी, चुंभळी भागात उस श्रेत्र मोठया प्रमाणात असल्याने या भागात पंधरा दिवसापासुन तीन ट्रॅक्टर मजुर उसतोडणी आले होते. शरयू अँँग्रो फलटण या साखर कारखान्याचा गळीत हंगाम संपत्यानंतर या भागातील काही ट्रॅक्टर चालकांनी उसतोडणी होईल. ट्रॅक्टर मजुराला रोजगार मिळेल. या आशेवर आले होते. दुर्देवी घटना घडल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

 


 

टाकळी मानुर ता. पाथर्डी येथून ऊसाने भरलेला डबल ट्रेलर ट्रॅक्टर टाकळीमानुर - पाथर्डी रस्त्यावर करोडी येथे मारुती मंदिराजवळ मागील ट्रेलर पुढील ट्रेलरवर आदळल्याने मागील ट्रेलर पलटी झाल्याने चालक जागीच ठार झाला. याबाबत सविस्तर वृत्त असे की, टाकळीमानुर येथील भागवत टेकाळे या शेतकऱ्यांचा उस भरलेला ट्रॅक्टर वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे जात असताना करोडी जवळील उताराला ट्रॅक्टर पलटी होऊन त्यात भाऊराव भास्कर काळे ( वय- 19 ) रा. बंगालीपिंपळा ता. गेवराई जि. बीड हा जागीच ठार झाला.

 

ट्रॅक्टर पलटी झालेला पाहून नागरिकांनी उसाच्या मोळ्या बाजूला फेकून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या चालकास बाहेर काढले. पाथर्डी येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात घेऊन त्यांच्यावर बंगालीपिंपळा ता. गेवराई येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत पाथर्डी पोलिसांत अकस्मात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल आजिनाथ बडे करत आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...