पाटोदा / नितिन भोंडवे
महाराष्ट्र सरकारने विविध प्रकारच्या योजना आखून प्रत्येक गावाचा ,गावातील वस्तीचा विकासा कडे लक्ष दिले आहे. या माध्यमातून वस्तीवरील रस्त्याचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, वीज अश्या अनेक मार्गाने विकासाकडे वाटचाल चालू आहे. परंतु अश्या अनेक गावातील वस्तीवरील रस्त्याचा, पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही.
पिट्टी मधील वसाहत असलेली खोमणेवस्ती ची अवस्था जर बघितली तर आतिशय वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. ही वस्ती अद्याप ही रस्ता व पाणी अश्या मूलभूत हक्का पासून वंचित आहे. ग्रामस्थांनी वेळोवेळी ग्रामपंचायतीला मागणी करूनही त्यांच्या प्रश्नाचा विचार केला नाही. वस्तीवरील मुलांना शाळेत जाण्यासाठी रस्ता नाही. पावसाळ्यात नदीला पाणी आल्यावर ग्रामस्थांना गावात येण्या - जाण्यासाठी खूप अडचण निर्माण होते. मुलांचं आयुष्य हे शिक्षणापासून आंधारमय होत आहे.
ग्रामपंचायतीला मागणी करूनही विचार केला नाही, त्यामुळे वस्तीवरील युवा नेते बाळासाहेब खोमणे यांनी आष्टी, पाटोदा, शिरूर आमदार बाळासाहेब आजबे यांच्याकडे सतत पाठ पुरावा केल्यामुळे वस्तीसाठी 25 / 15 योजनेतून रस्ता मंजूर करून कामाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी सहशिक्षक खोमणे सर, गंगाराम खोमणे, दीपक खोमणे, मयूर खोमणे, शहादेव भोंडवे, भिबिषेन खोमणे, परमेश्वर खोमणे, अमोल खोमणे, तुकाराम खोमणे, श्रीराम तुपे, जितेंद्र निर्मळ, संजय गायकवाड, पांडुरंग खोमणे, आदी उपस्थित होते..ह्या रस्त्यामुळे खोमने वस्ती वरील ग्रामस्थांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...