पोलीसांनी केला चार दिवसांत खुनाचा उलगडा, अल्पवयीन आरोपीस बालसुधारगृहात रवाना - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

शुक्रवार, १४ मे, २०२१

पोलीसांनी केला चार दिवसांत खुनाचा उलगडा, अल्पवयीन आरोपीस बालसुधारगृहात रवाना

शेवगाव पोलिसांना खुनाचा तपास लावण्यात यश
 
शेवगाव / जलभूमी वृत्तसेवा

शेवगाव तालुक्यातील खुंटेफळ येथे सोमवारी ११ वर्षीय सार्थक आंबादास शेळके या मुलाच्या हत्येचे कोडे उलगडण्यात शेवगाव पोलिसांना यश आले आहे. या हत्येप्रकरणी शेवगाव पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे . अल्पवयीन आरोपीने आपले चोरीचे बिंग फुटू नये म्हणुन ही हत्या केल्याचे समोर आले आहे.
 
 
शेवगाव तालुक्यातील खुंटेफळ येथे सोमवार दि . १० मे रोजी सायंकाळी ४ ते ४.३० वाजेच्या दरम्यान धारदार शस्त्राने मानेवर वार करून सार्थक शेळके ( वय ११ वर्षे ) याची राहत्या घरात हत्या करण्यात आली होती . याप्रकरणी मयत सार्थकचे वडील आंबादास शेळके यांच्या फिर्यादीवरून अज्ञात मारेकऱ्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. या घटनेमध्ये फिर्यादी आंबादास शेळके हे कुटुंबासमवेत घराबाहेर काम करत होते. यामुळे घरात कोणी नाही असे पाहुन आरोपी हा चोरी करण्यासाठी शेळके यांच्या घरात गेला होता . 
 
मात्र त्याचवेळी मयत सार्थक शेळके हा तेथे आल्याने आपले बिंग फुटू नये म्हणुन आरीने हातातील धारदार शस्त्राने सार्थक शेळके याच्या मानेवर वार करून जखमी केले होते . तपासात वेगवेगळी पथके तयार करून आरोपीचा शोध सुरु असतांना एका अल्पवयीन मुलाने हा खून केल्याची माहिती तपासी अधिकारी सपोनि सुजित ठाकरे यांना समजली . 
 
या माहितीची खातरजमा करून आरोपीला ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली. ताब्यातील अल्पवयीन आरोपीला श्रीरामपूर बालसुधार गृहात पाठवण्यात आले असून अधिक तपास सपोनि सुजित ठाकरे हे करत आहेत. आरोपी अज्ञात असतांनाही अवघ्या चार दिवसात पोलिसांनी खुनाचा उलगडा केल्याने नागरिकांमधून शेवगाव पोलिसांचे कौतूक होत आहे .
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...