झाडातून मिळणारा आँक्सिजन विकत घेण्याची वेळ आली हे दुर्दैव - डॉ. नरेंद्र घुले - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

सोमवार, ३१ मे, २०२१

झाडातून मिळणारा आँक्सिजन विकत घेण्याची वेळ आली हे दुर्दैव - डॉ. नरेंद्र घुले

भातकुडगांव हायस्कूलचे प्रा.त्रिंबक जाधव सेवााानिवृत्त
 

सलीम शेख 

भातकुडगांव / जलभूमी वृत्तसेवा 

------------------------------------

 

शेवगाव तालुक्यातील भातकुडगांव हायस्कूल चे मुख्याध्यापक त्रिंबक जाधव हे संयमी होते. प्रामाणिक पणा त्यांच्या अंगी होता. जनता शिक्षण प्रसारक मंडळात ३४ वर्षी सलग सेवा केली. माणूस कधीही सेवानिवृत्त होत नाही. ते शैक्षणिक संस्थेतून जरी सेवानिवृत्त होत असले तरी त्यांनी यापुढील काळात जनसेवेत झोकून द्यावे. असे प्रतिपादन माजी आ. डॉ. नरेंद्र घुले यांनी केले. भातकुडगांव हायस्कूल येथे प्रा. त्रिंबक जाधव यांचा सेवापूर्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता. 

 

 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र पा.घुले होते. घुले पाटील म्हणाले की, कोविड- १९ मुळे सर्व जन हैराण झालो आहोत. मृत्यू अंतिम सत्य आहे. कोरोना महामारीत स्वच्छता राखा, काळजी घ्या. भीती बाळगू नका. झाडे लावा, झाडे जगवा ही संकल्पना राबविणे गरजेचे आहे. झाडातून मिळणारा आँक्सिजन विकत घेण्याची वेळ आपल्यावर आली. हे दूर्देव आहे.

 

आळस झटका आनंदात जगा. असे सांगून ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे चांगले काम असल्याने राज्यात चौथा क्रमांक मिळवला. मुख्याध्यापक त्रिंबक जाधव यांच्या प्रदिर्घ सेवापूर्ती समारंभात जाधव दांम्पत्याचा सन्मान करण्यात आला. जाधव म्हणाले की, चांगल्या संस्थेत काम करण्याची संधी मिळाली ते माझ भाग्य समजतो. स्व. मारुतराव घुले पाटलांचा आदर्श घेऊन काम केले. 

 

मुख्याध्यापक पदावर असताना सर्व सहकार्याचे सहकार्य लाभले.अडचणीत व योग्य वेळी संस्थेकडून मदत मिळाली. आँनलाईन शिक्षणात भरपूर अडचणी येत आहेत. आपल्या सेवाकाळातील अनेक विषयांवर बोलत अनुभव सांगितले. यावेळी संजय पाऊलबुध्दे, तात्यासाहेब घुले, नंदू शेळके, कल्याण जगदाळे, मिलिंद कुलकर्णी, मुकूंद जमधडे यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचालन प्रदिप ताके यांनी करून आभार मानले. 

 

याप्रसंगी राष्ट्रीय युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, भावीनिमगांव सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, दैनिक जलभूमीचे संपादक बाळासाहेब जाधव, सरपंच अशोक वाघमोडे, उपसरपंच विठ्ठल फटांगरे, माजी सरपंच राजेश फटांगरे, मुकूंद जमधडे, बबनराव भुसारी, माजी उपसभापती अंबादास कळमकर, बाळासाहेब धोंडे, के.वाय. नजन, ज्ञानेश्वर चे संचालक सखाराम लव्हाळे, प.स.माजी सदस्य भास्कर शिंदे, सोसायटीचे अध्यक्ष पाराजी नजन, सखाराम वडणे, बाबासाहेब जमधडे, रावसाहेब मरकड, सचिन फटांगरे यांच्या सह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...