अहमदनगर/ जलभूमी वृत्तसेवा
----------------------------------
कोविड ड्युटीचे आदेश जबाबदार सरकारी अधिकाऱ्याच्या सहीने देण्यात येऊन त्याची सेवा पुस्तिकेत नोंद करणे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरती वरील बंदी तात्काळ उठवण्यात यावी, अघोषित शाळांना त्वरित अनुदान द्यावे. यासह अनेक विषय शिक्षक सेनेचे जिल्हा सचिव उद्धवराव सोनवणे यांनी सहविचार सभेत मांडले. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ज.मो.अभ्यंकर यांच्या अध्यक्षतेखाली नगर जिल्हा शिक्षक सेनेची ऑनलाईन सहविचार सभा नुकतीच संपन्न झाली.
या सहविचार सभेमध्ये जिल्ह्यातील शिक्षक सेनेची नोंदणी करण्याबरोबरच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात येऊन शिक्षकांचे प्रश्न लवकरच मार्गी लावण्याबाबत प्रांताध्यक्षांनी आश्वस्थ केले. सभा प्रारंभी कोविड मुळे मृत्यू पावलेल्या शिक्षक बांधवाना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या सभेप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रा.अंबादास शिंदे यांनी स्वागत करून कोविड सारख्या भयंकर संकटात सापडलेल्या शिक्षक बांधवाना करण्यात आलेली मदत व जिल्हा कार्यकरिणीचा वर्षभराचा आढावा सादर केला.
सभेत जुन्या पेन्शनचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढून, मूक बधिर,अस्थिव्यंग निवासी ,तांत्रिक व अल्पसंख्याक शाळांचे विविध प्रश्न मांडले. त्यावर सदर सभेत चर्चा करण्यात आली. सदर सभेच्या अध्यक्षीय भाषणात कार्यकर्त्यांना संबोधित करताना प्रांताध्यक्ष ज.मो.अभ्यंकर यांनी कोविड चे कारण न देता मरगळ झटकून संघटना वाढीसाठी निकराचे प्रयत्न करावे. विविध आघाड्यावर लढून शिक्षक बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे सांगून शालार्थ अगर वैद्यकीय बिलाबाबत कोणाची अडवणूक होत असल्यास जिल्हा संघटने मार्फत कळविण्यात आल्यास तात्काळ संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांकडून अन्याग्रस्थाना न्याय मिळवून देण्याचे काम केले जाईल, असे सांगितले.
सदर सभेचे सूत्र संचालन राज्य समन्वयक नितीन चौधरी यांनी केले. सदर सभेसाठी मुंबई अध्यक्ष अजित चव्हाण,राज्य सरचिटणीस रमेश चौगुले, मुंबई विभागाचे मुरलीधर मोरे व अरविंद नाईक,नाशिक विभागीय सरचिटणीस बबन चव्हाण तसेच जिल्हा कार्याध्यक्ष रावसाहेब म्हस्के, दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष महेश कुलकर्णी, उत्तर जिल्हा उपाध्यक्ष सत्यनाथ शेळके, पारुनाथ ढोकळे, अब्दुल सलाम, अजिंक्यदेव गायकवाड, विनायक आहेर, नंदकुमार डाळिंबकर, राजू पवार, लक्ष्मण सूर्यवंशी, शिवाजी आवारे ,जनार्धन हासे, भोगाडे आदींनी आपापल्या तालुक्याचा आढावा सादर करून चर्चेत भाग घेतला.तर महेश कुलकर्णी यांनी आभार व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...