निकेत फलके
अमरापूर / जलभूमी वृत्तसेवा
तालुक्यातील सुलतानपूर खुर्द व शहाजापुर या गावामध्ये नवज्योत फाऊंडेशन या संस्थेकडून गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, मारुती मंदिर, महालक्ष्मी मंदिर, जि प शाळा व गावातील सर्व गल्लीमध्ये तसेच शहाजापुर जि प शाळा, महादेव मंदिर तसेच संपूर्ण गावामध्ये सोडियम हायपोक्लाराईड या विषाणू व कीटकनाशकाने फवारणी केली.
यापुढे आठवड्यातून एकदा या दोन्ही गावामध्ये फवारणी करण्यात येईल. सर्वांनी मास्क वापरा व सुरक्षित रहा. असे नवज्योत फाऊंडेशन संस्थापक, माजी सरपंच अँड. अनिल फलके यांनी आवाहन केले. जिल्ह्यामध्ये कोविड रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. शेवगाव तालुका देखील दररोज 100 ते 200 रुग्ण वाढत असून तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीने आपल्या गावामध्ये रुग्ण संख्या वाढणार नाही. तसेच गावामध्ये विनाकारण फिरणाऱ्या लोकांना कोविड या आजाराविषयी मार्गदर्शन करणे गरजेचे असून आपले गाव कसे सुरक्षित राहतील. याकडे लक्ष दिले पाहिजे.यामध्ये गावातील नागरिक डॉ. विजय फलके ,शिरीष काळे , कारभारी मरकड, युवक आबासाहेब काते, वृषभ काते , संतोष काकडे, गोकुळ तरटे, सिद्धार्थ तरटे युवकांनी पुढाकार घेऊन गावामध्ये करोनाचा शिरकाव होणार नाही. याची काळजी घेऊ असे सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...