गावनिहाय लसीकरण नियोजन करा, अन्यथा आंदोलन - बामदळे - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

सोमवार, १० मे, २०२१

गावनिहाय लसीकरण नियोजन करा, अन्यथा आंदोलन - बामदळे

दहीगाव ने प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या १४ गावांना स्वतंत्र लसीकरण करावे.
 

बाळासाहेब जाधव 

शेवगाव / जलभूमी वृत्तसेवा 

 

शेवगाव तालुक्यातील दहीगाव ने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोवीड - १९ लसीकरण टप्प्याटप्प्याने चालू आहे. लसीकरणांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या १४ गावांमधील वीस ते पंचवीस किलोमीटर अंतर असणाऱ्या हिंगणगाव, खामगाव ,जोहरापुर, देवटाकळी, मजलेशहर इत्यादी गावांना येण्या-जाण्यास लांब असल्यामुळे व त्याठिकाणी नंबर पहाटे चार वाजल्यापासूनच लस घेण्यासाठी रांग लागत असल्यामुळे या गावातील रुग्णांना लस घेण्यासाठी फार मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. 

 

 

कोराना नियंत्रण समिती ज्याच्या त्याच्या नातेवाईकांना लस देण्यात मग्न असते. दहिगावने प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या गावातील लोकांना लसीकरण करणे गरजेचे असताना इतर ठिकाणावरून किंबहुना बाहेरील तालुक्यातील ही काही लोकांना त्या केंद्रात लस मिळत आहे. हिंगणगाव ने, जोहरापूर, खामगाव या ठिकाणावरून लस घेण्यासाठी जायचे म्हटल्यानंतर गोरगरीब जनतेला ज्यांच्याकडे मोटरसायकल सुद्धा नाही. अशा जनतेने कोणत्या वाहनाने जायचे याची मोठी पंचायत पडत आहे. 

 

पहाटे चार वाजता कुठल्याही प्रकार चे साधन त्या ठिकाणी जाण्यासाठी ऊपलब्ध राहत नाही. गोरगरीब जनता लसीपासून वंचित राहिलेली आहे. वरील चार-पाच गावातील लसीकरणाची टक्केवारी शून्न टक्के आहे. संपूर्ण अडचणीवर मात करून ही नंबर ला गेले तरीसुद्धा ढिसाळ नियोजनामुळे लस न घेताच कित्येक नागरिक पाठीमागे आलेले आहेत. या विषयावर संबंधित डॉक्टरांना दूरध्वनीद्वारे कळवले असून लवकरात लवकर खामगाव येथील उपकेंद्रा वर लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष संदीपराव बामदळे, संजय पवार, सतीश पवार, भास्कर बडधे, बाबूलाल पटेल, हरिचंद्र जाधव, लक्ष्मण पवार, कानिफनाथ धुमाळ, बाबासाहेब गरड, बाबासाहेब जाधव, नितीन जाधव इत्यादी कार्यकर्त्यांनी केली आहे. 

 

वरील मागणीचा विचार येत्या १५ मेपर्यंत केला नाही तर परिसरातील सर्व पात्र लस धारक नागरिकांसह खामगाव येथील उपकेंद्रावर लस मिळेपर्यंत साखळी आंदोलन करतील. असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष संदीपराव बामदळे यांनी पत्रकाद्वारे केला आहे.

 

अधिका-यांनी मुख्यालयात रहावे - बामदळे

कोरोना महामारीत सर्व विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात उपस्थित रहावे असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिलेले असताना अनेक विभागाचे अधिकारी, कर्मचारी मुख्यालयात रहात नाहीत. या बाबत अनेक तक्रारी प्रहार जनशक्ती पक्षाकडे आलेल्या आहेत. या संकटात सर्व विभागाच्या अधिका-यांनी मुख्यालयात रहावे. अन्यथा आपली तक्रार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या कडे करुन आपणा विरुद्ध कारवाई करण्यास भाग पाडू.
 
संदिपराव बामदळे,
तालुकाध्यक्ष- प्रहार जनशक्ती पक्ष, शेवगाव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...