सुपा, पारनेर / जलभूमी वृत्तसेवा
कोरोना बाधित रूग्णांची खाजगी रुग्णालयाकडून होणारी लूट थांबविण्यासाठी पारनेर शहरात नोडल अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली असल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मनसेच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. महाराष्ट्र नवनिर्मिन सेनेचे तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी तालुक्यातील विविध भागात रूग्णांची होणारी लूट व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी होणारी मागणी पहाता पवार यांनी जिल्हाधिकारी यांंना निवेदन पाठवुन विनंती केली होती. त्याची दखल घेत पारनेर तालुक्यात नोडल अधिकारी म्हणून पारनेर गटविकास अधिकारी माने यांंची नियुक्त करण्यात आली आहे.
तालुक्यातील रुग्णांची होनारी लुट नक्कीच थांबली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मनसेचे उपाध्यक्ष पवार यांनी गटविकास अधिकारी माने यांच्याशी भ्रमध्वनीवरुन संपर्क केला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. माने म्हणाले की, चार ऑडीटर नेमलेलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून पारनेर तालुक्यातील खाजगी हाॅस्पीटल मध्ये होणा-या कोरोना रुग्णांची लुट नक्कीच थांबली जाईल. जर तालुक्यातील रुग्णांचे हाॅस्पीटल बिल लाखाच्या पुढे जास्त आलेले असेल तर अशा सर्व रुग्णांनी बिडीओ यांना बिल पाठवून संपर्क साधावा.
ऑडिटरच्या माध्यमातून बिल चेक करुन वाढीव बिल कमी केली जातील. रुग्णांना मोठा आधार मिळेल. या संदर्भात काही अडचण आली तर महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या तालुक्यातील पदाधिकारी किंवा तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार यांना संपर्क साधावा. बिलामध्ये सरकारी नियमानुसार तफावत आढळली तर रुग्णांची रक्कम हाॅस्पीटल कडुन बिडीओ मार्फत वसूल करून सर्व सामान्य रुग्णांना न्याय मिळवून देता येईल असे अविनाश पवार म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...