महिलांना अश्लील भाषेत तगादा ; पोलिस ठाण्यात तक्रार - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

मंगळवार, १८ मे, २०२१

महिलांना अश्लील भाषेत तगादा ; पोलिस ठाण्यात तक्रार

लॉकडाऊन संपल्यावर हफ्ते वसुली करावेत
 
 

कर्जत / जलभूमी वृत्तसेवा
 
कर्जत तालुक्यातील महिलांना अनेक फायनान्स कंपनीवाले अश्लील भाषेत बोलत हफ्ता वसुली करतात. असा काहीसा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत संजय तुकाराम भिसे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
 

 

या तक्रारीत म्हटले आहे, वेगवेगळ्या फायनान्स कंपन्यांकडून महिलांना कर्ज दिले जाते. कर्ज वसुलीसाठी महिलांकडून तगादा लावला जातो. सध्या लॉकडाऊनमुळे अनेक महिला बेरोजगार आहेत. अशा परिस्थितीत पैसे शिल्लक नसल्याने हफ्ते भरता येत नाहीत. कर्जत तालुक्यात महिलांना कर्ज देणाऱ्या सर्व फायनान्स वाल्यांना पोलीस ठाण्यात बोलावून लॉकडाऊन संपल्यावर हफ्ते वसुली करावी, असे सांगण्यात यावे. अन्यथा महिलांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...