राष्ट्रवादीच्या सोनाली येवले यांची मागणी
नितिन भोंडवे
पाटोदा / जलभूमी वृत्तसेवा
कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी नागरीक पाटोदा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठी गर्दी करत असल्यामुळे संसर्गजन्य होण्याचा देखील संभाव्य धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे पाटोदा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात देखील लसीकरण सुरु करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाटोदा तालुका उपाध्यक्षा सौ.सोनालीताई येवले यांनी केली आहे .
पाटोदा तालुक्यातील अंमळनेर , डोंगरकिंन्ही , नायगाव , वहाली या आरोग्य
केंद्रात सध्या कोवीड प्रतिबंधक लसीकरण होत आहे. परंतु या ठिकाणी
लसीकरणासाठी येतांना जेष्ठ नागरीकांची मोठी हेळसांड होत आहे. एकतर बस
गाड्या बंद आहेत. यामुळे आरोग्य केंद्रा अंतर्गत असणाऱ्या गावातील जेष्ठ
नागरीकांना आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी येतांना खुप अडचणी निर्माण
झालेल्या आहेत.
पाटोदा तालुक्यातील अंमळनेर आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रात
अंमळनेर, पिंपळवंडी , कोतन, चिखली तर वहाली आरोग्य केंद्रा अंतर्गत
येणाऱ्या उपकेंद्रात वहाली, मुगगाव, कुसळंब, पारनेर, सौताडा तर
डोंगरकिंन्ही आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रात डोंगरकिंन्ही
तांबाराजुरी, महासांगवी , पारगाव घुमरा , पाटोदा तर नायगाव आरोग्य केंद्रा
अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात नायगाव , डोमरी , निरगुडी ,
तांबाराजुरी , दासखेड अशा पाटोदा तालुक्यातील आरोग्य उपकेंद्रात देखील
लसीकरण सुरु करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाटोदा तालुका
उपाध्यक्षा सौ.सोनालीताई येवले यांनी केली आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...