चांदा / जलभूमी वृत्तसेवा
----------------------------
महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारणमंत्री ना. शंकरराव गडाख यांच्या ५१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ना. शंकरराव गडाख युवा मंचच्या वतीने नेवासा तालुक्यातील चांदा प्राथमिक आरोग्य केंद्रास तीस खूर्चाची भेट देऊन साध्या पध्दतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. सध्या कोवीड १९ची परिस्थिती पाहता आपला वाढदिवसाच्या दिवशी कोणताही डामडौल करू नका.
हार तुरे, केक , बोर्ड असे काहीही न करता सामाजिक कामात कार्यकर्त्यानी सहभागी होऊन सामान्य नागरीकांचे प्रश्न सोडवावेत. असे आवाहन ना. गडाख यांनी केले होते . त्या आवाहनाला प्रतिसाद देत ना. शंकरराव गडाख युवा मंचने नेवासा तालुक्यातील चांदा प्राथमिक आरोग्य केंद्रास तीस खूर्च्या देऊन सामाजिक बांधिलकी जपली. युवा मंचचे सर्व पदाधिकारी चांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात खुर्चा घेऊन आले .
चांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ . संतोष मोरे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यानी युवा मंचच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानत त्यांनी सुरू केलेले सामाजिक कार्याचा गौरव केला . यावेळी गावचे माजी सरपंच संजय भगत , सोनईचे सरपंच धनंजय वाघ बाळासाहेब दहातोंडे , विजय रक्ताटे, रविंद्र जावळे, महेश दहातोंडे , गोरख दिवटे सुनिल भगत, पिनु बेल्हेकर , भुषण दहातोंडे , प्रदिप दहातोंडे, राजेंद्र दहातोंडे, अमित रासने, दिपक जावळे, बंटी कदम , सोमा जावळे ,सागर दहातोंडे मोसीम शेख , बाळासाहेब डागवाले, सचिन जावळे अमोल चौधरी, चांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.रजनिकांत पुंड डॉ .संतोष मोरे , डॉ .पालवे , डॉ पंडीत , आरोग्य सेविका सौ. शिंदे , सौ. मांडगे, मच्छिंद्र भालके आदि उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...