सरपंच परिषदेच्या सर्व प्रश्नाचा सरकारकडे पाठपुरावा करेल - आ. निलेश लंके - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

शनिवार, २९ मे, २०२१

सरपंच परिषदेच्या सर्व प्रश्नाचा सरकारकडे पाठपुरावा करेल - आ. निलेश लंके

सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची भाळवणी कोविड सेंटरला भेट
 

पारनेर / जलभूमी वृत्तसेवा 

---------------------------

 

सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, प्रदेश उपाध्यक्ष अनिल गीते पाटील, प्रदेश महासचिव विकास जाधव, नगर जिल्हाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी पारनेरचे आ. निलेशजी लंके यांच्या भाळवणी येथील कोविड सेंटरला भेट दिली. राज्यातील ग्रामपंचायतींना कोविड सेंटर उभारण्याचे आदेश राज्य सरकारने दिलेला आहे. त्या संदर्भामध्ये ग्रामपंचायतींना मार्गदर्शन व्हावे. 

 

 

ग्रामपंचायतींच्या सेंटरमधील सोयीसुविधा कशा असाव्यात. त्याच बरोबर आ. लंके यांच्या माध्यमातून सरपंच परिषदेने राज्य सरकार कडे पाठपुरावा केलेले अनेक प्रश्न कानावर घालून त्या प्रश्नांबाबत आपण राज्य सरकार कडून सरपंचाना न्याय द्यावा. अशी मागणी केली. आ. निलेश लंके म्हणाले, मी स्वतः सरपंच म्हणून माझ्या गावात काम केलेले आहे. ग्रामपंचायतींना अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागते. सरपंच पदावर काम करताना खूप मोठी कसरत सरपंचांना करावी लागते. 

 

सरपंच जे काम करू शकतो ते काम इतर लोकप्रतिनिधी करू शकत नाही. त्यामुळे सरपंचांची ताकत वाढवण्याचे सरपंच परिषद करत असलेले काम आणि सरपंच संघटन हे गरजेचे आहे. मी सरपंच परिषदेने दिलेल्या महत्वाच्या मागण्या नक्कीच शासनाकडून लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहील. अनिल गिते पाटील, विकास जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आबासाहेब सोनवणे यांनी आभार मानले. 

 


पाच मिनिटात पाठपुरावा


प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी राज्यातील कोरोनात मृत सरपंच, उपसरपंच, सदस्य यांना 10 लाखाची मदत , ग्रामपंचायत पदाधिकारी यांचा 25 लाखाचा विमा , व ग्रामपंचायत पदाधिकारी यांचे प्रथम लसीकरण या बाबत तात्काळ कार्यवाही व्हावी. असे सुचवले असता पाच मिनिटात आ. लंके यांनी मुख्यमंत्री , आरोग्यमंत्री , ग्रामविकास मंत्री यांना पत्र लिहिले. व मी हे करून देतो अशी ग्वाही दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...