निरगुडी गावामध्ये ॲटीजन टेस्ट कॅम्प चे आयोजन - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

बुधवार, १२ मे, २०२१

निरगुडी गावामध्ये ॲटीजन टेस्ट कॅम्प चे आयोजन

कॅम्प ला उत्स्फूर्त प्रतिसाद
 

नितिन भोंडवे 

पाटोदा /जलभूमी वृत्तसेवा 

 

पाटोदा तालुक्यातील निरगुडी गावामधे मा.आ.सुरेश आण्णा धस यांच्या मार्गदर्शनाखाली ॲटीजन टेस्ट करण्यासाठी कॅम्प च नियोजन करण्यात आले . कोरोणाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.अनेक जण टेस्ट करण्यासाठी जाण्यास वाहन ,उपलब्ध नसल्याने घरीच थांबतात. दुखणं अंगावर घेतात. टेस्ट करण्यासाठी आव्हान करूनही टेस्ट च प्रमाण लोकसंख्येच्या तुलनेत कमी दिसून येत आहे. 

 

 

टेस्ट वाढव्यात , कोरोना संक्रमित रुग्ण दिसून यावेत. वावरण्याने संसर्ग वाढू नये. त्यासाठी गावातील ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन मा. आ. धस यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्प च नियोजन केले. यावेळी उपस्थित डॉ. नागरगोजे, अशोक सुपेकर, प्रवीण सानप, सरपंच संतोष बेद्रे, उद्धव बेदरे, सखाराम दोडके, नायगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...