अबब......कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या नाष्ट्यामध्ये सापडल्या चक्क आळाया - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

गुरुवार, १३ मे, २०२१

अबब......कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या नाष्ट्यामध्ये सापडल्या चक्क आळाया

कोरोना रुग्णांना मिळते निकृष्ट जेवण, प्रशासनाचे दूर्लक्ष
 
कृष्णा पाटणकर
पिंपळवाडी / जलभूमी वृत्तसेवा

कोविड सेंटर मध्ये कोरोना रुग्णांना जेवण निकृष्ट दर्जाचे दिले जात असून सकाळी उपमा नाष्टा देण्यात आला. या नाष्ट्यामध्ये चक्क आळया आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
 

भुकेने व्याकुळ झालेले कोरोना ग्रस्त रुग्ण निकृष्ट दर्जाचे नाष्टा बघून संताप व्यक्त केला.  हा संपूर्ण प्रकार जायकवाडी येथील प्रबोधनी येथील कोविड सेंटरवर घडला आहे. याठिकाणी रुग्णांना पिण्यास पाणीही उपलब्ध नसल्याने व जेवण निकृष्ठ दर्जाचे दिले जात असल्याने रुग्णांनी नाराजी व्यक्त केली आहे.
 
 
या कोविड सेंटरला ३५ च्या जवळपास कोरोना पॉजिटीव्ह  रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांना दररोज सकस आहार देणे.व तो वेळेवर देणे आवश्यक असताना ही निकृष्ट जेवण तेही उशिरा देण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णांनी प्रशासनाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. 

जायकवाडी प्रबोधनी  या कोविड सेंटर मध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांनी  अनेकवेळा जेवणाबाबत नाराजी व्यक्त केली आहे .यासंदर्भात पैठण चे तहसीलदार यांनी  जेवण पुरवणाऱ्या ठेकेदाराला समज देऊन रुग्णांना उत्कृष्ट जेवण देण्यात यावे. यासाठी स्वतः लक्ष द्यावे.अशी रुग्णाकडुन विनंती करण्यात आली. 

रुम सॅनिटायझर करा - मागणी

रुग्ण बरा होऊन घरी केल्या नंतर कोविड सेंटर वरती मोकळी झालेली रुम व परीसर सॅनिटायझर करण बंद केले आहे. त्यामुळे नवीन रुग्णाला स्वतः रूम स्वच्छ करून घ्यावी लागत आहे.याकडेही तालुका प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...