पोलिसांना पोलीसांचा लागाना ठावठिकाणा - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

गुरुवार, ६ मे, २०२१

पोलिसांना पोलीसांचा लागाना ठावठिकाणा

वाळू हप्ते खोरीचा तपास संथगतीने, आरोपींना अटक कधी होणार ?
 

बाळासाहेब जाधव 

शेवगाव / जलभूमी वृत्तसेवा 

 

शेवगाव उपविभागीय पोलीस अधीक्षक कार्यालयातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर वाळू हप्तेखोरी बाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला. तीनही आरोपी फरार आहेत. या आरोपींना अटक करण्यात येणार आहे.तपासी पोलिसांना या आरोपी पोलीसांचा ठावठिकाणा लागत नसल्याने सर्वसामान्य जनतेतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

 

 

वाळू हप्ते खोरीतील आरोपी पोलिसांचा तपास संथगतीने चालू आहे. शेवगाव पोलीस स्टेशनला वसंत कान्हु फुलमाळी, पो कॉन्स्टेबल, ब.न. १८०८, वर्ग ३ नेमणूक -उप विभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव यांचे वायरलेस ऑपरेटर ( RTPC ) राहणार - शंकर नगर पाथर्डी, जि. अहमदनगर, संदिप वसंत चव्हाण, पो कॉन्स्टेबल, ब.न. ५६६, वर्ग - ३ नेमणूक - पाथर्डी पोलीस स्टेशन, सध्या संलग्न उप विभागीय पोलीस अधिकारी शेवगाव यांचे पथक राहणार - पोलीस वसाहत शेवगाव, जि. अहमदनगर, कैलास नारायण पवार पो. कॉन्स्टेबल, ब.न. २७९८, वर्ग - ३ नेमणूक - शेवगाव पोलीस स्टेशन, सध्या संलग्न - उप विभागीय पोलीस अधिकारी शेवगाव यांचे पथक राहणार- शंकर नगर, पाथर्डी यांच्या वर गुन्हा दाखल होवून तीन ते चार दिवस झाले.

 

तरी अद्याप आरोपीचा तपास लावण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरले आहे. या गुन्ह्याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक श्याम पवरे यांच्या कडे आहे. वाळूची ट्रक उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव सुदर्शन मुंढे यांच्या पथकातील कार्यरत वरील नमूद तिन्ही लोकसेवक यांनी दि. ७ एप्रिल रोजी वाळू वाहतूक करताना ट्रक पकडली. त्या ट्रकवर कारवाई न करता सोडण्याचे मोबदल्यात व वाळु वाहतुकीसाठी ट्रक चालू देण्यासाठी हप्ता म्हणून दि. ७ एप्रिल रोजी आयोजित लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान वरील नमूद तिन्ही लोकसेवक यांनी पंचा समक्ष तक्रारदार यांच्याकडे तडजोडी अंती १५ हजार लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली. 

 

आरोपी विरुद्ध शेवगाव पो स्टे येथे गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यापासून तीनही आरोपी फरार आहेत. गुन्हा दाखल होवून ७२ तासापेक्षा जास्त वेळ झाला असताना तपासी पथकाला अजून या पोलीस आरोपींचा ठावठिकाणा लागला नाही. 

 


एसपी साहेब, आपणच लक्ष घाला

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अनेक मोठ्या गुन्ह्याचा तपास लावला. परदेशाचा आश्रय घेणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या. पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यांवर कारवाई करताना हयगय केली तर जात नाही ना ? असा प्रश्न चर्चेला जात असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक ( एसपी ) मनोज पाटील यांनी जातीने लक्ष घालून या प्रकारणाचा छडा लावावा. या प्ररकरणात सहभागी असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर खातेनिहाय चौकशी करण्यात यावी. अशी माफक अपेक्षा सर्वसामान्य जनतेची आहे.

  

 


लोकेशन मिळत नाही- खेडकर

 तपासी पथक पाथर्डी, शेवगाव भागात पहाट पासून फरार आरोपीचे तपास घेत आहे. आरोपीचे लोकेशन अद्याप मिळाले नाही. त्यांचे फोन बंद आहेत. तपासी पथक दिवसभर बाहेरच आहे. कर्मचारी निलंबित बाबतचा विषय एसपी ऑफीसचा आहे. त्यांनी निलंबित केले आहे. एवढी माहिती आम्हाला समजली आहे. अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक हरिष खेडकर यांनी दैनिक जलभूमी शी भ्रमणध्वनीवर बोलताना दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...