निकेत फलके
अमरापूर /जलभूमी वृत्तसेवा
शेवगाव तालुक्यातील सुलतानपूर खुर्द ( फलकेवाडी ) गावात वीजमहामंडळाच्या भोंगळ कारभारामुळे मागील ३ दिवसांपासून लाईट नाही . संबंधीत विभागाचे अभियंता देशमुख व वायरमन नॉट रिचेबल आहेत . एकीकडे राज्य सरकार महाराष्ट्रामध्ये कडक निर्बंध लावलेत कि कोणीही घराबाहेर, गावाबाहेर पडू नका तर दुसरीकडे लोकांचे हाल करतांना वीज महामंडळ दिसत आहे .
अधिकारी फोन उचलत नाहीत व कार्यालयामध्ये हजर नाहीत . गावातील नागरिक दर महिन्यास वीजबिल भरणा करतात. तरी देखील महामंडळाने कुठलीही नोटीस न देता वीज मागील ३ दिवसांपासून बंद केली. गावातील दैनंदिन प्राथमिक गरजा अक्षरश: कोलमडल्या आहेत. गावातील पिठाची गिरणी हि मागील ३ दिवसांपासून बंद आहेत. लोक करोना महामारी बाहेर जाऊ शकत नाहीत. बाहेर गेले तर सुरक्षित घरी येतील का नाही याचा भरोसा नाही .
गावातील शालेय विद्यार्थी याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होताना पाहण्यास मिळते. त्यांचे ऑनलाईन क्लास यामुळे बंद झाले आहेत. गावामध्ये वायरमन फिरकत देखील नाही. त्यांंना संपर्क झाला असता ते म्हणाले कि, वरिष्ठांच्या आदेशामुळे गावातील वीज तसेच गिरणीसाठी आवश्यक असलेली वीज वाहिनी बंद करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकारी नॉट रिचेबल आहेत . गावातील लाईट हि लवकर सुरु करावी, यासाठी गावातील नागरिक आग्रही आहेत.
आम्ही गेल्या काही वर्षांपासून गिरणी व्यवसाय करत आहोत. दर महिन्याला न चुकता वीजबिल महामंडळाकडे भरत आहोत. तरी देखील वीजमहामंडळानेे गावातील तसेच गिरणीची लाईट कुठलीच नोटीस न देता बंद केली. ती लवकरात लवकर सुरु करावी. जेणेकरून गावातील नागरिक गावाबाहेर जाणार नाहीत. करोना काळात सुरक्षित राहतील.
गिरणी चालक, सुलतानपूर खुर्द
मी वारंवार संपर्क करून देखील वीजमहामंडळ अधिकारी हे नॉट रिचेबलच येत आहेत. ग्रामपंचायत सुलतानपूर खुर्द यांच्यामार्फत पत्र देऊन त्यांना सांगण्यात आले आहे की, गावातील गिरणी ही अत्यावश्यक मध्ये आहे. गावातील वीज लवकर सुरु करावी असे त्यांना सांगण्यात आले.
ग्रामपंचायत सुलतानपूर खुर्द/शहाजापूर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...