समर्शिबल पंप विक्रीत फसवणूक, दुकानदाराचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

बुधवार, १९ मे, २०२१

समर्शिबल पंप विक्रीत फसवणूक, दुकानदाराचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल

कंपणीचीच चूक असल्याची दुकानदाराची सावरासावर
 

 

कुकाणा / जलभूमी वृत्तसेवा 

 

नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील एका अँग्रो एजन्सीतून समर्शिबल पंपात फसवणूक केली असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ तून समोर आले आहे. कुकाणा ता. नेवासा येथील एका प्रसिद्ध अ‌ॅग्रो एजन्सी कडून एका शेतकऱ्यानी 3 / 15 ची समर्शिबल मोटार खरेदी केली. दुकानदाराने मागितली तेवढी रक्कम देण्यात आली. 

 


शेतकऱ्याला देण्यात आलेल्या समर्शिबल २ / १५ चा पंपाचे स्टिकर खोडून ३ / १५ चा पंप म्हणून विकला. अशा पध्दतीने शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली. ही बाब एका शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्याने सदर पंप दुकानात आणून जाब विचारला. त्यावेळी दुकानदाराने चुकल म्हणून कबुली दिली. मात्र हि चुकी माझी नसून कंपणीकडूनच ही चुक झाली असल्याची सावरासावर करण्यात आली. सोशल मिडीयावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.अशा पध्दतीने इतर शेतकऱ्यांची फसवणूक झाली तर नाही ना? अशी शंका निर्माण झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...