पोलीस स्टेशनला मिसींग दाखल
शेवगाव /जलभूमी वृत्तसेवा
शेवगाव तालुक्यातील भातकुडगांव येथील ज्ञानेश्वर भागवत सानप ( वय-२२ वर्ष ) हा दि.२५ मे रोजी रात्री १:३० च्या सुमारास ऊसतोड करिता ट्रॅक्टर घेऊन जातो. असे सांगून घरातून निघून गेला. तो परत घरी न आल्याने शेवगाव पोलिस स्टेशनला मिसिंग दाखल करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथील भागवत विक्रम सानप ( वय- 58 ) यांनी शेवगाव पोलीस स्टेशनला समक्ष हजर होऊन फिर्याद लिहून दिलु की, मी व पत्नी सुभद्रा, मुलगा ज्ञानेश्वर, नागेश वरील ठिकाणी राहत असून शेती व्यवसाय करतो. दि. 25 मे रोजी रात्री दीड च्या सुमारास आमच्या घरातील लोक झोपले असताना मुलगा नामे - ज्ञानेश्वर भागवत सानप ( वय-२२ वर्ष ) याने मी ऊसतोड करिता ट्रॅक्टर घेऊन जायचे आहे असे म्हणून घरातून निघून गेला.
तो परत घरी न आल्याने त्याचा आम्ही आमच्या गावी व नातेवाईकांकडे शोध घेतला. परंतु तो मिळून आला नाही. म्हणून पोलीस स्टेशनला खबर दिली आहे. रंगाने गोरा, चेहरा उभट, डोळे घारे, उंची ५.४ फुट असून निळसर रंगाचा चेक्सचा फुल बाह्याचा शर्ट, साधी पांढरी रंगाची पॅन्ट, पायात काळपट रंगाची चप्पल असे वर्णन आहे. अशा वर्णानाचा व्यक्ती कुठे आढळून आल्यास त्यांनी शेवगाव पोलिसांशी संपर्क साधावा. असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...