राहुरी कृषी विद्यापीठा ऑनलाईन कांदा बियाणे विक्रीचा झाला वांधा
अशोक मंडलिक
राहुरी कृषी विद्यापीठ येथे कांदा बियाणांची ऑनलाईन पद्धतीने विक्री होणार असल्याचे विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र संगणकीय अडचणीमुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांनी पाठवलेले पैसे कंपनीच्या व विद्यापीठाच्या पोर्टलवर दिसत नसल्याने मोठा गोंधळ उडाला असुन १० ते १५ हजार शेतकऱ्यांनी पैसे भरले असुन विद्यापीठाची यंत्रणा कोलमडली आहे.
राहुरी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पाटील, संशोधन संचालक डॉ.गडाख , बियाणे विभागाचे प्रमुख डॉ. आनंद सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु केलेली ऑनलाईन कांदा बियाणे विक्रीमध्ये संगणकीय अडचणी मुळ अधिकाऱ्यांची दमछाक उडाली आहे.
विद्यापीठाने हे ऑनलाईन कांदा बियाणे विक्रीचे काम पुणे येथील आवर्ता स्ट्रॅटेजी या संगणक कंपणीला दिले.
या कंपनीच्या चुकांमुळे ' शेतकरी या विक्री प्रणालीमुळे हैराण झालेले आहेत.संगणक तज्ञानी हा गोंधळ अजुन काही दिवस असाच राहाणार असल्याचे विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी सांगीतले आहे.
दि ११ जुन सकाळी आकारा वाजले पासुन ही विक्री चालू होणार होती. नंतर दुपारी तिन वाजले नंतरची वेळ देण्यात आली. मात्र ह्या संगणकीय तृटी दुर न झाल्याने दि. १४ जुन पासुन ही विक्री चालु होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
कंपनीचे संगणकतज्ञ जे सांगतील त्यावरच विद्यापीठाला अवलंबुन रहावे लागणार आहे.
या वरून विद्यापीठाच्या आधिकाऱ्यामध्ये संगणकीय ज्ञानाचा अभाव व अज्ञान दिसुन येत आहे. त्यामुळे विद्यापीठाला संगणक तज्ञाची नियुक्ती करणे गरजेचे आहे. संगणक प्रणालीवर विद्यापीठ मोठया प्रमाणात खर्च करत असुनही संगणकीय कामकाज खाजगी कंपणीस देण्याची केविलवाणी वेळ विद्यापीठावर आली आहे.
कांदा बियाणे खरेदीसाठीच्या नोंदणी पद्धती साठी सात -बारा उतारा , अधारकार्ड या पोर्टल वर आपलोड करून नोंदणी करता येणार होती. सामान्य शेतकऱ्यांना या बाबी शक्य नसल्याने त्यांनी सायबर सेंटरचा अधार घेतला.
त्यामुळे या नोंदणीसाठी १०० ते २०० रु जास्तीचे मोजावे लागत आहेत. तसेच गेल्यावर्षी पेक्षा या वर्षी बियाणा साठी पाचशे रुपये जास्तीचे मोजावे लागत आहेत.
राहुरी कृषी विद्यापीठामध्ये बियाणे विक्रीच्या बाबत कायमच गोंधळ होतो. कधी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज तर कधी संगणकीय गोंधळ हे नित्याचेच ठरले आहे.नेहमीच बियाणांचा व रोपांचा तुटवडा दिसुन येतो विद्यापीठाच्या रोपवाटीकांवर मोठया प्रमाणात खर्च होऊनही शेतकऱ्यांना पुर्ण क्षमतेने रोपे मिळत नाहीत.
यावर्षी अंब्याची रोपे न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांना हात हालवीत माघारी जावे लागले आहे.
विद्यापीठातुन नेहमीच बियाणे , रोपे , पुर्ण क्षमतेने व वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी वर्गात नाराजी दिसत असुन राहुरी कृषी विद्यापीठ संशोधनाच्या मोठमोठया गोष्टी केवळ कागदावरच करत आहे का?असा संतप्त सवाल शेतकरी वर्गातुन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...