अहमदनगर जिल्हा हादरला, युवकाचा भर चौकात धारदार शस्त्राने वार करून हत्या - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

शुक्रवार, ४ जून, २०२१

अहमदनगर जिल्हा हादरला, युवकाचा भर चौकात धारदार शस्त्राने वार करून हत्या

 

गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात, चांदयासह तालुक्यात खळबळ
 

 

अरुण सोनकर 

चांदा / जलभूमी वृत्तसेवा 

 

नेवासा तालुक्यातील चांदा येथे मागील भांडणाच्या कारणावरून तरूणाची काल रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान गावातील नदीजवळील भर चौकात धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली असून यामुळे चांदा आणि परिसरासह तालुक्यात खळबळ उडाली असून सोनई पोलिसात सदर घटनेचा गुन्हा दाखल झाला असून आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला आहे.

 


 

गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे . ज्ञानदेव उर्फ माऊली सोपान दहातोंडे ( वय ४० ) असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे . याबाबत चांगदेव नारायण दहातोंडे ( वय५० ) धंदा - शेती राहणार चांदा यांनी सोनई पोलिसात फिर्याद दाखल केली असून त्यात म्हटले आहे की, वरील वेळी व ठिकाणी घोडेगाव ते कुकाना रोड लगत चांदा नदीचे पात्रा जवळ मासे विक्री होतात. त्या ठिकाणी धनेश शिवाजी पुंड व त्याचे सोबती चा आणखी एक अनोळखी साथीदार यांनी त्यांच्याकडील पल्सर मोटार सायकल वरून घेऊन मागे अडीच महिन्यापूर्वी फिर्यादीचे चांदा गावातील हॉटेल जवळील एका जणाला यातील आरोपी धनेश शिवाजी पुंड याने मारहाण केली. 

 

त्यात मयत ज्ञानदेव दहातोंडे व इतर काहींनी आरोपी धनेश शिवाजी पुंड याला मारहाण केली व त्यांच्यात वाद झाला होता. तो परस्पर आपसात मिटविण्यात आला होता . चांदा गावात आरोपीचा अपमान झाला व गावात येण्यास नाक राहिले नाही असे आरोपी धणेश पुंड याने त्याचे आत्याचा मुलगा शिवतेज जावळे याच्याजवळ बोलून पण दाखवले होते व याच रोशातून घटनेचे रोजी आरोपी धनेश शिवाजी पुंड व त्याच्या सोबत त्याचा साथीदार अनोळखी इसम ( नाव पत्ता समजून शकलेे नाही ) हे त्याचे कडील पल्सर मोटर सायकल ( नंबर समजून आला नाही ) वरून येऊन आरोपी धनेश शिवाजी पुंड यांनी हातातील धारदार शस्त्राने ज्ञानदेव उर्फ माऊली सोपान दहातोंडे राहणार चांदा तालुका नेवासा यांचे डोक्यात वार करून त्यास हात जखमी करून त्यात जीवे ठार मारले आहे. 

 

वगैरे मजकुराची फिर्याद दिल्यावरून गुन्हा रजिस्टर नंबर व कलम २०१ / २०२१ भादवि कलम ३०२ , ३४ प्रमाणे नोंदविण्यात आला आहे. सदर घटनेने परिसरात खळबळ उडाली असून घटनेची खबर मिळताच सोनई पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे मोठा फोजफाटा घेऊन चांदयात दाखल झाले. काल रात्रीपासूनच गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून श्रीरामपूर उपविभागीय अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. दिपाली काळे, शेवगाव विभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे हे ही घटनास्थळी हजर झाले होते . 

 

दरम्यान घटनेचा रितसर पंचनामा करण्यात आला असून पोलिस आरोपीचा कसून शोध घेत आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटिल, शेवगाव विभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे , श्रीरामपुर विभागीय अप्पर पोलिस अधिक्षक डॉ दिपाली काळे यांच्या सुचना व मागदर्शनाखाली सोनई पोलिस स्टेशनचे सपोनी रामचंद्र कर्पे स्वतः या घटनेचा तपास करत आहेत .हे कॉ दत्तात्रय गावडे सहाय्यक फौजदार संजय चव्हाण , पोलिस नाईक शिवाजी माने , हे कॉ विठ्ठल थोरात , हे कॉ. बाबा वाघमोडे आदि सह मोठा पोलिस बंदोबस्त गावात तैनात करण्यात आला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...