जाधव पा. - सुरुसे पा. यांच्या शुभविवाहाला अनेक मान्यवरांची हजेरी - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

सोमवार, २१ जून, २०२१

जाधव पा. - सुरुसे पा. यांच्या शुभविवाहाला अनेक मान्यवरांची हजेरी

सत्कार समारंभाला फाटा देत बक्तरपूरच्या भैरवनाथ जयंतीला देणगी
 
शिवम् जाधव
शेवगाव / जलभूमी वृत्तसेवा
----------------

शेवगाव तालुक्यातील बक्तरपूर येथील मुरलीधर रंगनाथ जाधव यांचे नातू व लिंबाजी जाधव यांचा मुलगा चि.अविराज व शेवगाव तालुक्यातील भातकुडगांव येथील आदिनाथ देविदास आहेर यांची भाची तसेच पाथर्डी तालुक्यातील सुसरे येथील दादासाहेब सखाराम सुरुसे यांची पुतणी व हरिभाऊ सुरुसे यांची मुलगी चि.सौ.का. प्रियंका यांच्या शुभविवाह नुकताच सुसरे येथील तुळजा भवानी मातेच्या सभामंडपात संपन्न झाला. या शुभविवाहाला अनेक मान्यवरांनी हजेरी लावून शुभाशीर्वाद दिले. जाधव कुटुंबांनी सत्काराला फाटा देत बक्तरपूरच्या भैरवनाथ जयंतीसाठी १ हजार १०० रुपये देणगी देण्यात आली.
 
 ( छाया : वैष्णवी फोटो स्टुडीओ ,देवटाकळी)


चि.अविराज व चि.सौ.का.प्रियंका यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी जोग महाराज संस्थानचे राम महाराज झिंजुर्के, युवक किर्तनकार राम महाराज उदागे, समाजप्रबोधनकार शिवशाहीर कल्याण महाराज काळे, माजी आमदार चंद्रशेखर घुले,लोकनेते मारुतराव घुले ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक काकासाहेब नरवडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, शेवगाव- पाथर्डी विधानसभा प्रतिनिधी आमदार मोनिका राजळे, विष्णूपंत अकोलकर,संदीप खरड, भेंडा येथील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक शिवसेना नेते रामदास गोल्हार, अंबादास खराडे, पाथरवाला सोसायटीचे अध्यक्ष साहेबराव खाटीक,शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अँड.अनिल मडके, खरेदी विक्री संघाचे माजी उपाध्यक्ष, सरपंच शहादेव खोसे,कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष भागवत बडे, कौठा येथील राजे संभाजी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक उध्दवराव सोनवणे, सुधाकर आवारे, सतीष उदमले, अशोक गायकवाड, दैनिक जलभूमी चे निवासी संपादक शंकरराव मरकड, राष्ट्रीय भारुड सम्राट हमीद सय्यद, रामकिसन तापडिया, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष संदीप बामदळे, सतीश पवार, संजय पवार, डॉ. भास्करराव पवार, बक्तरपूर च्या सरपंच सौ.मंदाकिनी बेडके, सेवा सोसायटी अध्यक्ष बबन जाधव, भायगांव चे माजी सरपंच राजेंद्र आढाव, देवटाकळी चे उपसरपंच अशोक मेरड, अँड.लक्ष्मण लांडे, अशोक देवढे, मजलेशहर चे माजी सरपंच विक्रम लोढे, माजी सरपंच रविंद्र लोढे, ज्ञानेश्वर लोढे, आप्पासाहेब लोढे, माणिक शेकडे, दैनिक जलभूमी परिवारातील दिपक खोसे, सुनील रणमले, ईश्वर वाघमारे, सलीम शेख, बक्तरपूर चे माजी उपसरपंच आप्पासाहेब जाधव, भैरवनाथ पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष तुकाराम जाधव, माजी अध्यक्ष मारुती सामृत, राजेंद्र फाटके, हरिश्चंद्र जाधव, कृष्णा जाधव, बाळासाहेब जाधव, रविराज जाधव यांच्या सह धार्मिक, शैक्षणिक, राजकीय, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...