नगरपरिषदचे सफाई कामगारांचे आरोग्य धोक्यात ?
अशोक मंडलिक
राहुरी विद्यापीठ / जलभूमी वृत्तसेवा
राहुरी
नगरपरिषदच्या गलथान कारभारामुळे सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आलाय.
याची दखल कोणी घेणार का ? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
दोन दिवसांपासून राहुरी शहर हद्दीतील नवीपेठ परिसरात असलेल्या भूमिगत
गटारीचे साफ सफाईचे काम चालू आहे. त्यासाठी खाजगी लोकांकडून रोजंदारीवर काम
करून घेतले जात आहे. साफ सफाईचे टेंडर घेतलेल्या ठेकेदाराने सफाई
कामगारांना आवश्यक साहित्य पुरवीने गरजेचे आहे. मात्र ठेकेदार जास्त फायदा
करून घेण्यासाठी कामगारांना कोणतेही साहित्य पुरवीत नाहीत. कामगार गटारीत
उतरून हाताने गटारीतील घाण काढत आहेत. त्यांना बूट, हातमोजे, मास्क असे
कोणत्याही प्रकारचे साहित्य मिळत नाही. सध्या लाॅकडाऊन असल्यामुळे मोल
मजूरी करणाऱ्या लोकांना रोजगार मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची
वेळ आली आहे. अशा परिस्थितीत मिळेल ते काम करतात. याचाच गैरफायदा घेऊन
काही ठेकेदार या कामगारांच्या जिवीताशी खेळत आहेत.
कोरोना महामारीच्या काळात शासन हात स्वच्छ धूवा, मास्क लावा असे
वारंवार सांगत असताना ठेकेदाराकडून नियमांची पायमल्ली होत आहे. एखाद्या
कामगाराच्या जिवावर बेतले तर याला राहुरी नगरपरिषद प्रशासन किंवा संबंधित
ठेकेदार यापैकी कोण जबाबदार राहणार असा प्रश्न निर्माण होत आहे. पालिका
प्रशासनाने ठेकेदारांवर अंकुश ठेवणे गरजेचे आहे. मात्र टक्केवारीच्या
ठेकेदारीमध्ये तेरी भी चूप मेरी भी चूप असाच प्रकार राहुरी नगरपरिषद
प्रशासनाकडून सुरू असल्याची चर्चा आहे.
ना. तनपुरे लक्ष घालतील का ?
ना.
प्राजक्त तनपुरे यांची राहुरी नगरपरिषदेवर सत्ता आहे. मंत्र्यांच्या
गावातच जर कामगारांचे आरोग्य धोक्यात येवू पाहत असेल तर महाराष्ट्रांनी काय
आदर्श घ्यायचा. नगरपरिषदेच्या कारभारात ना. तनपुरे लक्ष घालून कामगारांना
न्याय मिळवून देतील का ? अशी चर्चा राहुरी शहरात एैकवयास मिळते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...