अवैध सावकारी करणार्‍यांच्या घरावर छापा, सावकारकी करणाऱ्यांंचे धाबे दणाणले - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

शुक्रवार, २ जुलै, २०२१

अवैध सावकारी करणार्‍यांच्या घरावर छापा, सावकारकी करणाऱ्यांंचे धाबे दणाणले

सहकार विभाग झाले आक्रमक : घराच्या झडतीमध्ये संशयास्पद कागदपत्र हाती
 
जामखेड / जलभूमी वृत्तसेवा 
 
जामखेड येथील अन्सार युसूफ पठाण, रा.सदाफुलेवस्ती यांच्या विरोधात अवैध सावकारी करत असल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थाच्याकडे दाखल झाली होती. त्यानूसार बुधवारी सहकार खात्याने पठाण यांच्या घरावर छापा टाकला. जिल्हा उपनिबंधक दिग्बिजय आहेर यांनी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 चेकलम 16 अन्वये कार्यवाही करण्यासाठी सहायक निबंधक, सहकारी संस्था, जामखेड यांना आदेश दिले होते.
 

त्यानुसार सहायक निबंधक देविदास घोडेचोर यांना कलम 16 अन्वये अवैध सावकार पठाण याच्या घराची झडती घेण्यासाठी पथक नेमले. या पथकात सहकार अधिकारी प्रथम श्रेणी साहेबराव पाटील हे पथक प्रमुख, तर सहकार अधिकारी द्वितीय श्रेणी अल्ताफ शेख, कनिष्ट लिपीक संतोष वासकर, कनिष्ट लिपीक निलेश मुंढे यांचा समावेश होता. या पथकासोबत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या घोडेचोर यांनी पंचासह धाड टाकुन झडती घेतली. या झडतीमध्ये कोरे चेक, कोरे बाँड, विसार पावती असे अनेक संशयास्पद कागदपत्रे आढळुन आली आहेत. ही कागदपत्रे पुढील कार्यवाहीसाठी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, जामखेड यांच्या कार्यालयात सादर करण्यात आली आहेत.
 
सापडलेल्या कागदपत्रांची पडताळणी करुन अवैध सावकारा विरुध्द महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 नुसार कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईसाठी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्हयातील अवैध सावकारांच्या जाचास त्रस्त व पिडीत नागरीकांनी स्वत:हून पुढे येवुन सहकार विभागाकडे पुराव्यासह तक्रार नोंदवावी. या तक्रार बाबत अर्जदार यांनी गोपनियता बाळगण्यात येवून अवैध सावकार कायद्यानूसार कारवाई करण्याचा इशारा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...