शेतकऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी पुरस्कार - साळवे
बाळासाहेब जाधव
शेवगाव / जलभूमी वृत्तसेवा
शेतकऱ्यांनी शेतीमध्ये अनेक प्रयोग करत असतात. पिकाची उत्पादन उत्पादकता ही भरीव प्रमाणात वाढत असते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांची प्रयोगशीलता अबाधित राहावी व त्यांचे मनोबल वाढण्यात मदत व्हावी. स्थानिक शेतकऱ्यांना त्यांनी उत्पादकता वाढीसाठी वापरलेले पीक उत्पादन तंत्रज्ञान अवगत करून उत्पादकतेची वाढ करावी. ही पुरस्कार देण्याची शासनाची भूमिका आहे. असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ साळवे यांनी केले.
खरीप हंगाम 2020-21 मध्ये राज्यांतर्गत पीक स्पर्धा आयोजित करण्यात आले होते या स्पर्धेतील तालुकास्तरावर विजेत्या शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. शेवगाव पंचायत समिती सभागृहात कृषी दिनाच्या निमित्ताने कृषी संजिवणी मोहीम समारोप व पीक स्पर्धा विजेते शेतकऱ्यांचा सत्काराचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ साळवे होते. प्रमुख पाहुणे म्हणून लहू जायभाय होते. याप्रसंगी जायभाय यांनी कृषी दिनानिमित्त वसंतराव नाईक यांची कृषी क्षेत्रातील भरीव कार्य तसेच त्यांचा जीवनपट विषद करण्यात आला. जिल्हा स्तरावरील विजेते शेतकरी ( हरभरा पीक ) बाबासाहेब भिकाजी वावरे, वरूर ( प्रथम क्रमांक) महेश चंद्रकांत म्हस्के, वरुर ( तृतीय क्रमांक ) पटकावून अनुक्रमे दहा हजार व पाच हजार रोख, सन्मानचिन्ह देण्यात आले.
तालुकास्तर विजेती शेतकरी ( हरभरा पीक) श्रीमती शोभा मधुकर वावरे ( वरूर ), बाळासाहेब बापूराव धावणे ( मुर्शतपुर), बाळासाहेब खरात ( कांबी ), गहू पीक- नितीन मधुकर वावरे ( वरूर ), उत्तम शंकर जाधव ( बक्तरपूर ), रविंद्र लक्ष्मण थोरात ( रांजणी ), ज्वारी पीक- बाळासाहेब भीमराव खरात ( कांबी ), अशोक रामनाथ चौधरी ( अमरपुर ), राहुल शेषराव पाटील ( हातगाव ) यांनी पिकनिहाय अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावित अनुक्रमे पीकनिहाय 5 हजार, 3 हजार, 2 हजार रोख व सन्मानचिन्ह देण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी महेश डोके, कृषी विज्ञान केंद्र दहिगांवने येथील प्रमुख शास्त्रज्ञ श्यामसुंदर कौशिक, तालुका कृषी अधिकारी किरण मोरे, कृषी अधिकारी राहुल कदम, सारंग दुगम, गौतम फाजगे, रामकिसन जाधव, कानिफनाथ मरकड उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...