जिल्ह्यात गुन्हेगारी फोपावली, नागरिकांत उलट-सुलट चर्चेला उधाण - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

सोमवार, ९ ऑगस्ट, २०२१

जिल्ह्यात गुन्हेगारी फोपावली, नागरिकांत उलट-सुलट चर्चेला उधाण

बहुतांश पोलीस ठाण्यांमध्ये आंंधळ दळतय, कुत्र पिठ खातय अशी अवस्था
 
भाऊ कदम 
बोरी फाटा/जलभूमी वृत्तसेवा

वरिष्ठ अधिकार्‍याचा तालुका पातळीवरील पोलीस स्टेशनवर अंकूश नसल्याने गुन्हेगारी फोपावली आहे. या गुन्हेगारीला आळा बसणार की गुन्हेगारी लोकांना पोलीस मित्राचा दर्जा देऊन सर्वसामान्यवर अंकुश ठेवणार याबाबत जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावामध्ये उलट सुलट चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. 


कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांना यावर वरिष्ठांचे कुठलेही नियंत्रण ठेवणे शक्य न झाल्याने बहुतांश पोलीस ठाण्यांमध्ये आंंधळ दळतय कुत्र पिठ खातय अशी अवस्था निर्माण झाली आहे. तालुक्यातील पोलीस निरीक्षकासमोर अनेक आव्हाने आहेत.पोलीस कर्मचाऱ्याच्या छुप्या पाठिंब्यावर परिसरातील अवैध धंदे जोमात चालू असून सर्वसामान्य जनतेचे मात्र कोरोना महामारीमुळे कंबरडे मोडले आहे. पोलीस ठाण्यामध्ये अवैध धंद्यवाल्यांना मानपान देवून बसायला खुर्ची दिली जाते. सर्वसामान्य नागरिकांना तक्रार देण्यासाठी दोन दोन तास ताटकळत थांबावे लागत आहे. वरिष्ठांनी तालुका पोलीस प्रशासनावर बारीक लक्ष ठेवून अवैध व्यावसायिकांची पोलीस ठाण्यातील वर्दळ सर्वप्रथम थांबवली पाहिजे. जिल्ह्यात अनेक अवैध धंद्यावर हप्ते खोरी चालू आसल्याची चर्चा ऐैकवयास मिळते. 

वाळू माफिया, गौण खनिज अवैध वाहतूक करत असणारे ढंपर अगदी रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण करून उभी करत असतात. अवैध प्रवासी वाहतुकीची वाहनधारकांकडून मिळणारी चिरीमिरी काही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत लाखाचा आकडा पार करत असल्याचे बोलले जाते.अवैध उद्योग हप्ते खोरीमुळे एकप्रकारे पोलीस ठाण्याने परवाने दिल्यासारखे सुरू आहेत. प्रत्येक ठिकाणाहून हप्ता गोळा करणाऱ्या हवालदाराचा रुबाब तर कलेक्टरला लाजवेल असाच आहे. 

रोज नवनवीन बकरे शोधून त्याला मोठ्या हॉटेलात मेजवानी द्यायला लावायची. आणि तेथेच सेटलमेंट करायची. हे चित्र नागरिकांना नेहमीचे झाले आहे. त्यामुळे प्रथम आपल्या सहकारी कर्मचारी वर अंकुश ठेवून नंतर गुन्हेगारीवर अंकुश ठेवणे सगळ्याच पोलीस ठाण्यांच्या पोलीस निरीक्षकासमोर आव्हान आहे. जिल्ह्याचे नेतृत्व करून राजकारणात दबदबा निर्माण करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा यामध्ये अप्रत्यक्ष संबंध असल्याची आणि त्यांच्या नेत्यांचा वरदहस्त असल्याची बाब आता लपून राहिलेली नाही.याबाबत सध्या उलटसुलट चर्चा झडत आहे. वरिष्ठांनी वेळीच लक्ष घालून तालुका पोलीस प्रशासनावर अंकुश ठेवून गुन्हेगारी करणाऱ्या वर जरब निर्माण करावी. अशी मागणी जोर धरु लागली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...