गोळीबार करत गुंडांनी ग्रामीण पतसंस्था लुटली - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

शनिवार, ७ ऑगस्ट, २०२१

गोळीबार करत गुंडांनी ग्रामीण पतसंस्था लुटली

व्यवस्थापक सोनवणे गंभीर जखमी,पाच लाखाची रोकड लुटली
 

सुपा / जलभूमी वृत्तसेवा 

 

अहमदनगर-पुणे महामार्गावरील बेलवंडी फाटा येथे असलेल्या पारनेर ग्रामीण पतसंस्थेच्या शाखेवर गोळीबार करीत अज्ञात दरोडेखोराने सुमारे ५ लाख रुपयांची रोकड भरदिवसा लुटूण्याची घटना शनिवार दि. ७ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. हल्लेखोरास विरोध करणारे शाखाधिकारी बाळासाहेब सोनवणे यांच्यावर गोळीबार करण्यात आला असून छातीच्या खाली गोळी लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

 


 

याबाबत पोलिस सुञाकडून मिळालेल्या माहिती अशी की, शुक्रवारी दुपारच्यावेळी एक लाल शर्ट परिधान केलेल्या व डोक्यात हेलमेंट घातलेल्या व्यक्तीने शाखाधिकारी आत नाही पाहून महीला रोखपालावर रिव्हॉल्व्हर रोखुन पैशाची मागणी केली. रोखपाल महिला शाखाधिका-यांना बोलायला गेली आसता चोरट्याने आत येवून पैसे घेत निघुन जाण्याचा प्रयत्न केला. चोरटा जात असताना शाखाधिकारी आला. त्यांनी त्या चोरास झाडूने मारण्याचा प्रयत्न केला असता चोराने शाखाधिका-यावर एक गोळी झाडली. त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत.असे पोलिस सुञानी सांगितले. 

 


 

जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे सभापती काशीनाथ दाते संस्थापक अध्यक्ष असलेल्या पारनेर ग्रामीण पतसंस्थेची नगर-पुणे महामार्गावरील बेलवंडी फाटा येथे शाखा आहे. शाखा व्यवस्थापक बाळासाहेब सोनवणे हे दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शाखेबाहेर गेले असता पाळत ठेऊन असलेल्या दरोडेखोराने शाखेत प्रवेश केला.रोखपाल महिलेवर रिव्हॉल्व्हर रोखून तिच्या जवळील सुमारे ५ लाख रुपयांची रोकड हस्तगत केली.दरम्यानच्या काळात शाखाधिकारी सोनवणे शाखेत पोहचले. त्यांनी दरोडेखोरास झाडूने मारहाण करण्याचा प्रयत्न सुरुवातीस केला असता दरोडेखोराने त्यांच्यावर गोळीबार केला व रोख रक्कम पाच लाख वीस हजार घेऊन आपली मोटारसायकल होंडा शाईन घेऊन पुण्याच्या दिशेने पोबारा केला असुन लुटमार व गोळीबार सी.सी.टि.व्हीत स्पष्ट दिसत आहे . 

 

बाळासाहेब सोनवणे यांच्या छातीखाली गोळी लागली असून त्यांना शिरूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.प्रकृती चिंताजनक असल्याने सोनवणे यांना पुण्याकडे हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती कळताच जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील, सुपा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक नितीनकुमार गोकावे, साहाय्यक पी. आय.पवार, साहाय्यक निरिक्षक मनोज मुढे, खंडेराव शिंदे यांनी घटना स्थळी भेट दिली. व सी.सी,टि व्ही फुटेजच्या आधारे लुटारुचा शोध घेतला जात आहे. यासाठी काही पथके बनवून विविध ठिकाणी रवाना केले आहेत . लुटारु पैसे चोरताना व गोळीबार करताना सी,सी.टि.व्हीत स्पष्ट दिसत असून पोलिसांनी विविध ठिकाणी नाकेबंदी करत पथके रवाना केली आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...