तहसीलदार अर्चना पागिरे यांच्या पाठपुराव्याला यश
शेवगाव : जलभूमी वृत्तसेवा
कै. मुरलीधर आनंदराव सागडे हे मंदिरात पूजा करत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने नदीच्या प्रवाहात वाहून जाऊन दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या परिवाराला उदरनिर्वाहासाठी शासकीय मदत मिळावी. याकरिता तहसीलदार यांनी पाठपुरावा केल्यानंतर सागडे कुटुंबास तहसीलदार अर्चना पागिरे यांच्या हस्ते ४ लाख रुपयाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील वडुले येथील कुटुंबावर मोठा आघात झाला होता. नदीच्या पाण्यामुळे -पाण्यात वाहून गेल्याने सागडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटना समजताच त्यांची शोध मोहीम सुरु केली होती. मात्र दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह हाती लागला. तहसीलदार यांनी सागडे परिवाराची प्रत्यक्ष भेट घेऊन नातेवाईकांचे सांत्वन केले होते.सागडे कुटुंबातील कर्ते व्यक्ती होते. या घटनेमुळे तेच गमावल्याने त्यांच्या कुटुंबाची मोठी हानी झाली होती. त्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, याकरिता तहसीलदार अर्चना पागिरे यांनी संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार तहसीलदार अर्चना पागिरे यांच्या हस्ते मयताच्या पत्नी सिंधुबाई मुरलीधर सागडे, मुले आप्पासाहेब व पोपट, मुलगी सुनीता यांना धनादेशाचे देण्यात आला. यावेळी वडुले येथील सरपंच प्रदीप नानासाहेब काळे, संदीप गायकवाड, कृष्णाभाऊ सागडे, संजय सागडे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...