भातकुडगांव फाटा येथे प्रहारचे जनसंपर्क कार्यालयाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
भातकुडगांव फाटा / जलभूमी प्रतिनिधी
------------------------------------
राजकारणात कार्यकर्त्यांचा कढीपत्ता म्हणून वापर केला जातो. परंतु प्रहारने समाजसेवेचे व्रत हाती घेतल्याने कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक दिली जाते. प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी चांगले काम करत असेल तर प्रहार सैनिकाकडून आदर केला जाईल.मात्र जर शेतकरी, शेतमजूर, दिनदलीत, दिव्यागांंना कोणी वेठीस धरत असेल तर त्याची गय करणार नाही. आम्हाला पक्षप्रमुख ना.बच्चू कडू साहेबांनी चांगली शिकवण दिली आहे. जाणीवपूर्वक कोणी चुकत असेल तर चुकला का ठोकला.अशी भूमिका प्रहार जनशक्ती पक्षाची आहे.
जिथ अन्याय तिथ प्रहार केल्याशिवाय आमचा प्रहार सैनिक राहणार नाही. असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी यांनी केले.
शेवगाव - नेवासा राज्यमार्गावरील भातकुडगांव फाटा येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रहारचे जेष्ठ मार्गदर्शक दादासाहेब काकडे होते, तर प्रमुख पाहूणे म्हणून
प्रहारचे जिल्हा सचिव प्रकाश बेरड, दिव्यांग जिल्हाध्यक्षा लक्ष्मीताई देशमुख, मालोजी शिखरे, राम शिंदे, नितीन पानसरे, शिवशाहीर कल्याण महाराज काळे, राष्ट्रीय भारुड सम्राट हमीद सय्यद, तुकाराम शिंगटे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी नितीन पानसरे, राजेश लोढे, बाळासाहेब जाधव, कल्याण काळे, संदीप बामदळे, प्रकाश बेरड, दादासाहेब काकडे यांची भाषणे झाली.
जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी यांनी दहिगांव-ने गटप्रमुख पदी राजेश लोढे, सोशल मिडिया तालुका प्रमुखपदी विकास गटकळ, विद्यार्थी संघटना अध्यक्ष पदी महेश घनवट , कार्याध्यक्षपदी रामदास लिंभोरे, तालुका उपाध्यक्ष पदी प्रविण निकम, विद्यार्थी सचिव सचिन रासिनकर यांच्या निवडी जाहीर करून नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक शेवगाव - पाथर्डी विधानसभा अध्यक्ष रामजी शिदोरे यांनी केले.
सुत्रसंचालन संजय पवार तर आभार कल्पेश दळे यांनी मानले.
यावेळी भायगांवचे माजी सरपंच राजेंद्र आढाव, गणेश खंबरे, अनिल मेरड, विठ्ठल आढाव, अशोक चितळे, आण्णा दुकळे, सतिष पवार, रामभाऊ शिंदे, महादेव आहेर,
बाळू विर, हरिश्चंद्र जाधव, संजय फाटके, लक्ष्मण आगळे, मच्छिंद्र आर्ले यांच्या सह तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिंगबर लोढे यांंचा सत्कार
शेवगाव तालुक्यातील मजलेशहर येथील दिंगबर लोढे हे परिसरात मंडप व्यवसाय करतात. ज्यांचे आई, वडील स्वर्गवासी झाले. जे अनाथ मुली आहेत. अशा मुलींच्या लग्नाला लोढे आवर्जून मंडप देतात. मात्र एक रुपयाही मंडपाचे घेत नाहीत. ही बाब जिल्हाध्यक्ष परदेशी यांना माहीत होताच. त्यांनी लोढे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
गाव तिथे शाखा, घर तेथे प्रहार सैनिक
नामदार बच्चू कडू यांचे विचार, ध्येय धोरणे सर्व घटकातील तळागाळातील शेतमजूर, कामगार, दिव्यांग बंधू-भगिनी, विधवा निराधार यांच्या पर्यंत पोहचून जेथे सेवेची संधी निर्माण होईल.तेथे आमचा प्रहार सैनिक हजर राहून अन्यायाविरुद्ध लढा देईल. आगामी काळात शेवगाव तालुक्यात गाव तेथे शाखा, घर तेथे प्रहार सैनिक तयार करु.
संदिपराव बामदळे
प्रहार तालुकाध्यक्ष, शेवगाव

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...