तरूण शेतक-यांचा संसार उघड्यावर
ढोरजळगांव :जलभूमी वृत्तसेवा
---------------------------
शेवगांव तालुक्यातील ढोरजळगांव येथील विजय जालिंदर पाटेकर यांच्या राहत्या घराची भिंत सोमवारी रात्री झालेल्या पाऊसामुळे पडल्याने पाटेकर या तरुण शेतकऱ्यांचा संसार उघड्यावर आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, गेल्या काही दिवसापासुन सततच्या पावसाने बळीराजा मेटाकुटीला आला असुन सतंतधार पाऊसामुळे पिकेही धोक्यात आली आहेत.
कालच्या पावसाने ढोरजळगांव येथील तरूण शेतकरी विजय पाटेकर यांच्या राहत्या घराची भिंत अचानक कोसळली. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नसुन घराची भिंत कोसळल्यामुळे विजय पाटेकर यांचा संस्कार उघड्यावर आला असुन महसुल विभाग व ग्रामविकास विभागाने पाहणी करुन पंचनामा करून त्वरीत मदत देण्याची मागणी ग्रामस्थांमधुन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...