ढोरजळगांव येथील शिवसेना कार्यकर्ते व ग्रामस्थांच्यावतीने साळवेंचा सत्कार
----------------------------
शिवसेना पक्षाची गांव तेथे शाखा स्थापन करण्याचा आपला माणस असुन ग्रामीण भागातील सर्वसामन्य वर्गाला बरोबर घेऊन भविष्यात शिवसेना तळागाळात पोहचविण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे नव्याने शिवसेनेत प्रवेश केलेले भातकुडगांव गटाचे जि.प.सदस्य रामभाऊ साळवे यांनी दैनिक जलभूमी प्रतिनिधींनीशी बोलताना व्यक्त केले.
रामभाऊ साळवे यांचा नुकताच शिवसेनेत प्रवेश झाल्याबद्दल ढोरजळगांव येथील शिवसेना कार्यकर्ते व ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
साळवे पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे शेतकरी हितावह निर्णय घेण्याची चांगली भुमिका असुन कोरोना काळात महाराष्ट्रातील जनतेला ख-या अर्थाने धीर देऊन सर्वोतोपरी मदत महाआघाडी सरकारने केली असुन भविष्यातही चांगले निर्णय घेतले जातील.
शेवगांव तालुक्यातील पुरग्रस्त भागातील शेतक-यांना नुकसान भरपाई मिळवुन देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्नाची ग्वाही रामभाऊ साळवे यांनी दिली.
यावेळी मधुकर कराड, विष्णुपंत नवले,बाबासाहेब कराड,भरत भालेराव,ज्ञानदेव जाधव,,दत्तात्रय जाधव, शुभम जाधव, ज्ञानेश्वर कराड, दुर्येधन गि-हे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...