मुळा धरण आकर्षक विद्युत रोषणाईने नटले - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१

मुळा धरण आकर्षक विद्युत रोषणाईने नटले

धरण परिसरात चैतन्य व आनंदाचे वातावरण
 
संदीप दरंदले
सोनई / जलभूमी वृत्तसेवा 
 
राहुरी ( जि.अहमदनगर ) येथील मुळा धरण पुर्ण क्षमतेने भरले असल्याने उजवा ,डावा कालवा व मुळा नदी पात्रात जायकवाडी धरणासाठी 11 दरवाज्यातुन पाणी सोडले जात आहे. हे अकरा दरवाजातून पाणी सोडताना तिरंग्या रंगांची विद्युत रोषणाई आकर्षित करत आहे.जेष्ठ नेते व माजी खा.प्रसाद तनपुरे यांच्या संकल्पनेतून मुळा धरणाच्या कार्यकुशल कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. यानिमित्ताने अतिशय चैतन्य व आनंदाचे वातावरण धरण परिसरात पसरले आहे. 



यावर्षी सुरवातीला पाऊसाचे प्रमाण अतिशय कमी होते. पण वेळेवर पाऊस पडत होता.यामुळे धरणात आवक पण थोडीफार होती.मागच्या महिन्यात पाऊस कमी झाला होता. यामुळे शेतकरी वर्गातुन मुळातुन पाणी सोडण्याची मागणी झाली होती.पण धरण भरले नसल्याने तसेच समन्यायी पाणी वाटपामुळे जायकवाडी धरण पण भरले नाही. तर मुळातुन पाणी सोडावे लागते.यामुळे पाणी मिळेल का नाही हा अंदाज पण परतीच्या पाऊसाने धरण पुर्ण क्षमतेने भरले.यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले असुन आता डाव्या व उजव्या कालव्यातुन आवर्तन पण सुटले आहे.हवामान तज्ञ पंजाबराव डक यांचे अंदाज खरे ठरत असल्याने शेतकरी डख यांना धन्यवाद देत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...