बालमटाकळीत गांजाच्या झाडांची बेकायदेशीर रित्या लागवड ; पोलीसांचा छापा - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

बुधवार, ३० ऑगस्ट, २०२३

बालमटाकळीत गांजाच्या झाडांची बेकायदेशीर रित्या लागवड ; पोलीसांचा छापा

एका संशयीतास पोलिसांनी घेतले ताब्यात 

शेवगाव प्रतिनिधी
 
शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, पोलीस ठाण्याचे परीक्षा विधीन आयपीएस अधिकारी बी चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तालुक्यातील बालमटाकळी  येथे घातलेल्या छाप्यात एका शेतात लागवडीस बंदी घातलेल्या गांजा च्या झाडांची बेकायदेशीर रित्या लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याबाबत शंकर आसराजी छाजेड रा. बालमटाकळी या संशयीतास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून सुमारे 70 हजार रुपये किमतीची 13 किलो 965ग्रॅम वजनाची गांजा ची दोन हिरवी रंगाची मोठी झाडे मिळवून आल्याची माहिती पोलीस ठाण्यातून सांगण्यात आली.


याबाबत माहिती अशी की, उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील व शेवगाव पोलीस ठाण्याचे परीक्षा विधीन आयपीएस पोलिस अधिकारी रेड्डी यांना तालुक्यातील बालमटाकळी येथील शेत जमीन गट नंबर 74 मध्ये शंकर आसराजी छाजेड याने त्याच्या स्वतःच्या मालकी शेतात शासनाने लागवडीस बंदी घातलेल्या गांजा च्या झाडांची बेकायदेशीर रित्या लागवड केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यानंतर पोलीस पथकाने त्या ठिकाणी छापा घातला असता तेथे सुमारे 70 हजार रुपये किमतीच्या हिरव्या रंगाची गांजा ची मोठी 2 झाडे मिळवून आली याबाबत संशयित आरोपी शंकर छाजेड यास ताब्यात घेण्यात आले असून पो हे काँ नानासाहेब साहेबराव गर्जे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्याच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 858/2023 गुंगीकारक औषधी द्रव्य मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थआदि नियम 1985 अन्वये रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...