दुष्काळी सदृश्य परिस्थिती निर्माण झालेल्या ठिकाणी चारा,पाण्यावर खर्च करा
बाळासाहेब जाधव
नगर / प्रतिनिधी
गेल्या एक- दोन महिण्यापासुन पाउस नसल्यामुळे दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. शेतक-या बरोबर जनावरावर उपासमारीची वेळ आलेली आहे. शेवगाव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहिर करा. अशी जनतेतून मागणी होत असताना प्रवरा यंत्रनेकडून रोज लाखो रुपयांची होताना दिसत आहे.खासदार साहेब, रोजचा लाखो रुपयांची उधळपट्टी थांबवा. दुष्काळी सदृश्य परिस्थिती निर्माण झालेल्या ठिकाणी चारा,पाण्यावर खर्च करा. अशी मागणी जोर धरत आहे.
दुष्काळी सदृश्य परिस्थिकडे विखे पिता- पुत्र लक्ष केंद्रित का ? असा सवाल जनतेमधून विचारला जात आहे.
खरीप पिकांचे पावसाअभावी नुकसान झाले आहे. शासनाने एक रुपयात पिक विमा उतरून पिकांना संरक्षण दिले आहे. मात्र पिक विमा मंजुरीसाठी खासदार गप्प का ?अशी चर्चा शेतकरी वर्गातून केली जात आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून रस्ते, वीज, पाणी हे प्रश्न गंभीर रुप धारण करत आहे. सध्या राज्यात व केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. तरीही नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली जात आहे.
अनेकांनी केले जलभूमीचे कौतुक
दै.जलभूमीने काल मंगळवार दि. २९ ऑगस्ट २३ च्या अंकात विखे पाटलांकडून रोज लाखो रुपयांची उधळपट्टी ? आगामी लोकसभेची तयारी ; मतदारांना देवदर्शनाचे प्रलोभन या मथळ्याखाली प्रकाशझोत टाकला होता. जिल्हाभरातून प्रतिक्रिया उमटल्या अनेकांनी संपादक बाळासाहेब जाधव यांना भ्रमनध्वनीवर व सोशलमिडीयावर प्रतिक्रिया देवून आभार व्यक्त केले.
खासदार साहेबांचे दर्शन दुर्लभ
मागिल पंचवार्षिक निवडणुकीवेळी डॉ. सुजय विखे यांनी पूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता. मतदारांना ठिकठिकाणी जेवणावळी देवून विकास कामाची ग्वाही दिली होती. निवडणूक आल्यानंतर खासदार साहेबांचे दर्शन दुर्लभ झाले असल्याचा अनुभव मतदारसंघातील जनतेला आला.
खासदार म्हणून विकास कामे महत्त्वाची
एक जळजळीत वास्तव मांडल्या बद्दल,जलभुमी पत्रकारांचे स्वागत, व सर्व टीम ला धन्यवाद.! एक खासदार म्हणून विकास कामे महत्त्वाची असून शेतकऱ्यासाठी काहीतरी करा ,अतिवृष्टी अनुदान जमा नाही,कांदा अनुदान जमा नाही,कित्येक लोक पी एम किसान पासून वंचित आहेत, गोर गरीब डोल पासून वंचित आहेत,रस्ते सुविधा,लाईट सुविधा ,भ्रष्ट व्यवस्था,याकडे लक्ष दिले तर ,मतदार राजा खुश होईल व विजय तुमचाच होईल,यात शंका नाही.
एक मतदार राजा
आपल्या जलभूमी वृत्तपत्रात बातमी वाचन्यात आली व्हाट्स अँप ला. बर वाटले या वर लिहणारे कोणी तरी आहे. हया जाहिरातीच्या जगात तुम्ही ही बातमी केली आम्ही आपले आभारी आहोत. अशी तुळजापूर वारी वर ही बातमी बनवा आमच्या शिर्डीच्या लोकांसाठी.
एक वाचक
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...