...अन्यथा तीव्र आंदोलन छेडू
शेवगाव
शेवगाव तालुक्यात विजेचा खेळखंडोबा चालू आहे. शेतीसाठी फक्त दोन ते चार तास वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे शेतीसाठी आठ तास वीज द्या अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा माजी आ. चंद्रशेखर घुले यांनी दैनिक जलभूमी संपादकाशी बोलताना दिला.
याबाबत अधिक माहिती देताना माजी आ.घुले म्हणाले की, मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. त्यांनी महापारेषण 132 के. वी.शेवगाव सबस्टेशन येथील 50 MVA क्षमतेचा पॉवर ट्रान्सफॉर्मर जळाला.या सबस्टेशन मध्ये 50 MVA चे दोन ट्रान्सफॉर्मर होते.एक जळल्यामुळे तालुक्यातील एकूण 12 सबस्टेशन चा लोड एक 50 MVA पॉवर ट्रान्सफॉर्मर वरून चालू आहे.क्षमता कमी झाल्यामुळे दिवसा चालू असणाऱ्या शेती फिडर वर लोड शेडींग करावे लागत आहे. असे सांगितले.
चार-पाच दिवसापासून तीन चार तासच वीज पुरवठा केला जातो. शेवगाव सबस्टेशन येथील 50 MVA क्षमतेचा पॉवर ट्रान्सफॉर्मर जळाला त्यांच्या दुरुस्तीला पंधरा दिवस लागणार आहे. मग पंधरा दिवसात पिके राहतील का ?
फक्त आपल्या तालुक्यात विशेषतः दहिगाव- ने जिल्हा परिषद गटात लोडशेडिंग करून शेतकऱ्यांवर अन्याय करु नका ? सर्वच भारताचे नागरीक आहेत सगळ्यांना समसमान न्याय मिळाला पाहिजे हि भुमिका पाहिजे. जर असा जाणिवपूर्वक दुजाभाव केला जात आहे. तर तो चालणार नाही. तात्काळ वीज पुरवठा सुरळीत न केल्यास कोणत्याही क्षणी तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा जेष्ठ कार्यकर्ते शिवाजी गवळी, बाजार समितीचे उपसभापती गणेश खंबरे, माजी अध्यक्ष अँड.अनिल मडके, संचालक अशोक मेरड,खरेदी विक्री संघाचे संचालक बाळासाहेब जाधव, दुध संघाचे संचालक राजेश फटागरे, भातकुडगाव चे सरपंच अशोक वाघमोडे, उपसरपंच विठ्ठल फटागरे, भायगावचे सरपंच राजेंद्र आढाव, जोहरापूरचे माजी सरपंच अशोक देवढे, मजलेशहर सरपंच अशोक लोढे, हरी ओम पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष विक्रम लोढे, मठाचीवाडी चे सरपंच सतीष धोंडे, माऊली निमसे, देवटाकळी चे सरपंच ज्ञानदेव खरड, आदिनाथ खरड,सतीश पवार यांच्या सह शेतकऱ्यांनी दिला आहे.
रात्रीचे शेती फिडर पूर्ण वेळ चालू ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे .नेवासा तालुक्यातील व पाथर्डी तालुक्यातील सबस्टेशन मधून काही लोड घेण्यासाठी लिंक लाईन चे मेंटेनन्स करून प्रयत्न करण्यात येत आहे. महापारेषण मार्फत लवकर 50 MVA क्षमतेचा पॉवर ट्रान्सफॉर्मर बदलणे करिता पाठपुरावा चालू आहे. तालुका स्तरावर हे प्रयत्न चालू असतानाच राज्य स्तरावर लोड व जनरेशन याचे तफावती मुळे गावठाण व शेती फिडर ला सुचनेनुसार एमर्जन्सी लोड शेडिंग पण करावे लागत आहे.
उपकार्यकारी अभियंता
महावितरण शेवगाव
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...