जनतेला, शेतकऱ्यांना वा-यावर सोडणार नाही मा.आ. घुले यांची ग्वाही
शेवगाव - संपादक
सध्या दुष्काळी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. शेतकर्यांचा जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे वीज, पाणी प्रश्न उग्र रुप धारण करत आहे. शेवगाव तालुक्याच्य मुलभूत प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असून आपण जनतेला, शेतकऱ्यांना वा-यावर सोडणार नाही. अशी ग्वाही माजी आ.चंद्रशेखर घुले पाटील यांनी दिली.
शेवगाव तालुक्यातील श्री क्षेत्र गुंफा ( भातकुडगाव ) येथील तिसर्या सोमवारी काळेश्वर देवस्थानला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. काळेश्वरचा अभिषेक माजी आ.चंद्रशेखर घुले यांच्या हस्ते घालण्यात आला.यावेळी बोलताना घुले म्हणाले की, पावसाने दडी मारण्याने हातातोंडाशी आलेली पिके वाया चालली आहेत. मुळा पाटबंधारे कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्याकडे आपले शिष्यमंडळ पाठवून व निवेदन दिले होते. शेतीसाठी तातडीने आवर्तन न सोडल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला होता.या निवेदनाची दखल घेवून कार्यकारी अभियंता यांनी तातडीने बैठक बोलावून शेतीसाठी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेऊन शुक्रवारी (दि.१ ) सायं- ६ वा आवर्तन सोडण्यात आले. विजेच्या प्रश्नावरही वरिष्ठ अधिकार्याशी बोललो आहे. त्यावर काहीतरी मार्ग काढण्याची विनंती केली आहे. वीज, पाणी प्रश्न गंभीर स्वरूपाचे बनले आहे. काहीजन यामध्ये राजकारण करत आहे. जनतेला समान न्याय दिला पाहिजे. विजेबाबत भेदभाव केला जात आहे. या भागावर अन्याय केला जात आहे. येथील शेतकरी बाहेर देशातून आलेला नाही. तो भारतीय नागरिक आहे. यापुढे असा भेदभाव केल्यास जनता सहन करणार नाही.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ. चंद्रशेखर घुले होते.प्रास्तविक कामधेनु पतस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब काळे यांनी केले. तर सूत्रसंचालन संजय पवार यांनी केले. आभार भाकूडगावचे उपसरपंच विठ्ठल फटांगरे यांनी मानले. याप्रसंगी जेष्ठ कार्यकर्ते बाबूलालभाई पटेल, भायगावचे सरपंच राजेंद्र आढाव, भातकुडगावचे माजी सरपंच शंकर नारळकर यांची भाषणे झाली. यावेळी जेष्ठ कार्यकर्ते रामचंद्र घुमरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गणेश खंबरे, संचालक अशोक मेरड, राहुल बेडके, शेषराव दुकळे, राम आहेर, भातकुडगावचे सरपंच अशोक वाघमोडे, दूध संघाचे संचालक राजेश फटांगरे, खरेदी विक्री संघाचे संचालक बाळासाहेब जाधव. माजी संचालक भगवान आढाव,ज्ञानदेव खरड, अशोक दुकळे,चेअरमन सचिन फटांगरे, आदिनाथ खरड, आप्पासाहेब फटांगडे, मच्छिंद्र आर्ले, अमोल वडणे यांच्यासह शेतकरी,कार्यकर्ते, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी आ. घुले यांचा सत्कार
माजी आ. चंद्रशेखर घुले पाटील यांनी श्री क्षेत्र गुंफा येथील काळेश्वर देवस्थानचा क वर्ग तीर्थ क्षेत्रात समावेश करून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देवून विविध विकास कामे मार्गी लावली. त्यामुळे भाविकांच्या वतीने माजी आ.घुले पाटील यांचा सत्कार करण्यात आला. देवस्थान च्या विकास कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही यावेळी माजी आ.चंद्रशेखर घुले ( भाऊ ) यांनी यावेळी दिली.
.jpeg)
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...