एकत्रित सण साजरा न करणेचे आवाहन
शेवगाव । प्रतिनिधी
--------------
लम्पी चर्म रोगाने बाधित जनावरे असलेल्या गाव व त्याचे २० कि.मि. परिसरातील गावात जनावरांचे बाजार शर्यती, जत्रा, प्रदर्शन किंवा जनावरे एकत्रित करण्यास मनाई करण्यात यावी.असे पशुधन विकास अधिकारी यांनी पोलीस निरीक्षक यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
पत्रात पुढे म्हटले आहे की, शेवगाव तालुक्यातील ९१ गावांमध्ये गोवर्ग जनावरांमध्ये लम्पी संसर्गजन्य चर्म रोग पसरलेला आहे. हा आजार माशा, गोचीड, गोमाशा व डासांमुळे पसरला जातो. अदयाप पावेतो शेवगांव तालुक्यात ९१ गावांमध्ये या रोगाने बाधित ८८६ जनावरे आढळून आलेले आहेत.
तालुक्यातील जनावरांमध्ये लम्पी विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा सुरु झाला असून त्यामुळे संदर्भीय जिल्हाधिकारी, अहमदनगर यांचे आदेशाने संपूर्ण अ.नगर जिल्हा बाधित व सतर्कता क्षेत्र म्हणून जाहीर केलेला आहे. तालुक्यातील कोणत्याही गावामध्ये यावर्षीचा पोळा सन जनावरे एकत्रित करुन साजरा करता येणार नाही. त्यादृष्टीने आपले पोलीस स्टेशन अंतर्गत गावामध्ये पोळयानिमित्त कोणत्याही प्रकारे जनावरे एकत्रित होऊ देऊ नये तसेच त्यांची मिरवणूक वगैरे प्रकार करण्यात येऊ नयेत त्यासाठी योग्य प्रकारे सूचना आपले मार्फत देण्यात याव्यात.
शेतकऱ्यांनी जनावरे एकत्रित करू नये - पुजारी
शेवगांव तालुक्यात ९१ गावांमध्ये या रोगाने बाधित ८८६ जनावरे आढळून आलेले आहेत.पशुधन विकास अधिकारी यांनी आम्हाला कळविले आहे. जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण अ.नगर जिल्हा बाधित व सतर्कता क्षेत्र म्हणून जाहीर केलेला आहे. तालुक्यातील कोणत्याही गावामध्ये यावर्षीचा पोळा सन जनावरे एकत्रित करुन साजरा करु नये.
विलास पुजारी,
पोलीस निरीक्षक, शेवगाव
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...