भातकुडगाव फाटा येथे पाणी वापर संस्था पदाधिकारी, अधिकारी चर्चा सत्र संपन्न
शेवगाव । प्रतिनिधी
--------------
मुळा पाटबंधारे विभागाच्या टेलच्या भागातील पाणी वापर संस्थेला हक्काचे पाणी मिळाले पाहिजे. नियमानुसार टेल टू हेड पाणी वाटप झाले पाहिजे. मागिल दुष्काळात अनेक संस्था तोट्यात गेल्या. त्यामुळे संस्थेवर थकबाकी वाढली. शासनाने मागिल सर्व माफ करुन संस्था उर्जावस्थेत आणाव्यात असे प्रतिपादन माजी आ.चंद्रशेखर घुले पाटील यांनी केले.
शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव फाटा येथील वरदराज लॉन्स मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मुळा पाटबंधारे विभागाच्या अधिकारी, कर्मचारी,पाणी वापर संस्थेच्या पदाधिकारी, शेतकरी चर्चासत्रात अध्यक्षपदावरून माजी आ. चंद्रशेखर घुले पाटील बोलत होते.
व्यासपीठावर लोकनेते मारुतराव घुले पाटील श्री ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक काकासाहेब नरवडे, कृषी व पशु संवर्धन समितीचे माजी सभापती सभापती दिलीपराव लांडे,कार्याध्यक्ष संजय कोळगे,शिवाजीराव गवळी, अंबादास कळमकर बबनराव भुसारी पवन साळवे अमरापूर उपविभागीय अभियंता स्वप्निल देशमुख, चिलखनवाडी उपविभागीय अभियंता संदीप पवार शाखा अधिकारी सुधीर चव्हाण, बिरबल दरवडे, राहींज
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय कोळगे, बाबूलाल भाई पटेल अँड. अनिल मडके,राहुल बेडके, खरेदी विक्री संघाचे चेअरमन निकम
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भायगावचे सरपंच राजेंद्र आढाव यांनी केले.सुत्रसंचालन खरेदी विक्री संघाचे संचालक, दै.जलभमीचे संपादक बाळासाहेब जाधव यांनी केले. आभार शिवाजी गवळी यांनी मानले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गणेश खंबरे, संचालक अशोक मेरड, भातकुडगाव माजी सरपंच शंकरराव नारळकर, सेवा सोसायटीचे चेअरमन सचिन फटांगरे जोहरापूरचे माजी सरपंच अशोकराव देवडे सरपंच अशोकराव वाघमोडे उपसरपंच विठ्ठलराव फटांगरे शिवसंग्राम चे जिल्हा सरचिटणीस संदीप बांधले सतीश पवार संजय पवार, परसराम चोपडे उपस्थित होते.
चेअरमन, संचालक मंडळाचे अभिनंदन
लोकनेते मारुतराव घुले पाटील श्री ज्ञानेश्वर सहकार कारखान्याचे चंद्रशेखर घुले व ज्येष्ठ संचालक काकासाहेब नरवडे यांनी शेतकऱ्यांना मागील गळीतास गेलेल्या उसाला प्रतिटन १२७ रु.चे पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले. त्याबद्दल कारखान्याचे चेअरमन डॉ. नरेंद्र घुले यांचे अभिनंदन करून संचालक चंद्रशेखर घुले पाटील, काकासाहेब नरवडे यांचे विशेष सत्कार करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...