आंदोलनाच्या इशा-यानंतर अखेर त्या कर्मचाऱ्याची बदली रद्द - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

गुरुवार, ७ सप्टेंबर, २०२३

आंदोलनाच्या इशा-यानंतर अखेर त्या कर्मचाऱ्याची बदली रद्द

ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्याला यश ; कर्मचारी मुळ ठिकाणी रुजू

शेवगाव । प्रतिनिधी
 
शेवगाव तालुक्यातील अमरापूर उपविभाग अंतर्गत भातकुडगाव शाखेत दिपक राहिंज यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु पाटबंधारे अभियंता यांनी राहींज याची माका येथे बदली करण्यात आल्याने टेलच्या भागातील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेवुन भातकुडगाव फाटा येथे रस्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.


आंदोलनाच्या इशा-यानंतर अखेर त्या कर्मचाऱ्याची बदली रद्द करण्यात आली असून ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्याला यश आले. सदर कर्मचारी मुळ ठिकाणी रुजू झाले. उपकार्यकारी अभियंता मुळा पाटबंधारे एस.बी. पवार यांनी अमरापूर उपविभागीय अभियंतेला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, श्री दीपक अशोक राहिंज यांची विनंती, लेखापाल बदली संदर्भ क्रमांक १ व २ या विभागांतर्गत मुळा पाटबंधारे उपविभाग, अमरापूर पाटबंधारे शाखा अमरापूर येथे करण्यात आली.  श्री. राहिंज यांनी ०१/०७/२०१७ रोजी पाटबंधारे शाखा अमरापूर येथे निवेदनाद्वारे हजेरी लावली.  उपविभागातील प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी श्री.  राहिंज यांची पाटबंधारे शाखा अमरापूर येथून पाटबंधारे शाखा भातकुडगाव येथे तात्पुरती नियुक्ती करण्यात आली व पुन्हा प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी श्री.  राहिंज यांची तात्पुरती माका, पाटबंधारे शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे. भातकुडगाव येथील शेतकरी यांनी  राहिंज, मोजनीदार यांच्याविरुद्ध प्राप्त झालेली तक्रार उपविभागाकडे पाठविण्यात आली आहे. ग्रामपंचायत, जोहरापूर अंतर्गत श्री.  राहीज विरोधात आलेली तक्रार खोटी असल्याचे सांगण्यात आले आहे.  तसेच श्री.राहिंजचे हस्तांतरण दोन दिवसात रद्द न केल्यास दि.07/09/2023 रोजी भातकुडगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे. ग्रामपंचायत भातकुडगाव श्री अंतर्गत भातकुडगाव येथे राहिंज नियुक्तीचा ठराव प्राप्त झाला आहे.

आपल्या स्तरावर प्राथमिक चौकशी करून 3 ते 5 मध्ये नमूद केलेल्या मुद्द्यांबाबत तात्काळ अहवाल सादर करावा. तसेच संबंधित अर्जदारास 07/09/2023 रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यापासून रोखण्यात यावे व कार्यवाहीचा अहवाल सादर करावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...