वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी घेतली जलभूमी वृत्ताची दखल
शेवगाव । प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली ? यामथळ्याखाली तर विशेष चौकटीत पोलीस निरीक्षक तपास यंत्रनेतून गायब ? गुरुवार दि. ३१ ऑगस्ट च्या अंकात वृत्त प्रसिद्ध करुन जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे लक्ष वेधले होते. सदर वृत्त प्रसिद्ध होताच पोलीस प्रशासनात खळबळ उडवून उलट सुलट चर्चेला उधाण आले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या वृत्ताची दखल घेत पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना मुळ जागी विराजमान केल्याने अनेकांनी समाधान व्यक्त करून जलभूमी वृत्तपत्राचे आभार मानले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शेवगाव शहर व तालुक्याच्या ग्रामीण परिसरात ऑगस्ट महिन्यात चोऱ्यांच्या घटनेत वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले. या पैकी एकाही घटनेचा तपास लावण्यात पोलीस यंत्रणेला यश मिळाले नसल्याचे जनतेतून नाराजीची भावना व्यक्त होताना पहावयास मिळाली.तर काही ठिकाणी तपासात ठोस प्रगती नसल्याने चोरट्यांची उमेद वाढल्याचे चित्र दिसून आले. पोलीस ठाण्याचे परीक्षा विधीन आयपीएस अधिकारी बी चंद्रकांत रेड्डी यांचा दबदबा असताना चोरांनी वर डोके काढले कसे ? असा प्रश्न जनतेच्या चर्चेतून विचारला गेला.
शेवगाव शहरातील गजबजलेल्या मारवाड गल्लीतील दुहेरी हत्याकांड, तालुक्यातील अमरापुर येथील श्री रेणुका माता देवस्थानमधील सोन्या चांदीचे आभूषणे, छत्री टोप मासोळ्या समया तांब्या फुलपात्रे राजदंड असा तब्बल 17 लाखाचाऐवज चोरट्यांनी चोरून नेला. चोरीच्या घटनेतील मुद्देमालाचा शोध पोलिसांच्या दृष्टीने आव्हान ठरले.
यापैकी काही घटना सीसीटीव्ही फुटेज मध्ये स्पष्ट दिसत असताना तपासात प्रगती दिसत नसल्याने जनतेतून साशंकता व्यक्त केली गेली.
पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांची शेवगाव पोलीस स्टेशनला नेमणूक होवून एक वर्षे झाले. एक वर्षात त्यांनी तालुक्याचा चांगला अभ्यास करून काही गुन्हेचा तपास लावला. पोलीस ठाण्याचे परीक्षा विधीन आयपीएस अधिकारी बी चंद्रकांत रेड्डी यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेवगावला नेमणूक केली.पोलीस निरीक्षक विलास पुजारी व परीक्षा विधीन आयपीएस अधिकारी बी चंद्रकांत रेड्डी यांनी काही दिवस सोबत काम केले. मात्र मध्येच कुठेतरी माशी शिंकली. विलास पुजारी यांची पोलीस निरीक्षक पदावर नेमणूक असताना त्यांना उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाचे कामकाज पहावयास सांगितले. तेव्हापासून विलास पुजारी पोलीस निरीक्षक पदावर असताना तपास यंत्रनेतून गायब असल्याचे पहावयास मिळत असल्याने जनतेत उलट सुलट चर्चेला उधाण आले होते. या बाबीकडे जलभूमी वृत्तपत्राने जिल्हा पोलीस अधीक्षकांचे लक्ष वेधले. काल गुरुवार दि. ७ रोजी सायं.विलास पुजारी यांना मुळ पोलीस निरीक्षक पदावर बसविण्यात आल्याने जनतेमधून समाधान व्यक्त करून जलभूमी चे आभार मानले.
हातचे बाहुले बनू नका ?
पुजारी साहेब,
गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. अनेक गुन्हेचा तपास लागलेला नाही. पोलीस ठाण्याचे परीक्षा विधीन आयपीएस अधिकारी बी चंद्रकांत रेड्डी यांची नव्याने तालुक्यात नेमणूक झाल्याने त्यांना तालुक्याचा पूर्ण अभ्यास नव्हता. ठराविक पोलीस उपनिरीक्षक, कर्मचारी सांगतील त्या पध्दतीने रेड्डी साहेब तपास यंत्रणा हलवत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे तपासात प्रगती करण्यात अपयश आले. असे म्हणल्यास वावगं ठरणार नाही. त्यामुळे आपण अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांपासुन सावध भुमिका घेऊन त्यांच्या हातचे बाहुले बनून काम करु नका. तुमच्या पुढे अनेक तपासाचे आव्हाने आहेत. तुमच्याकडे जनता अपेक्षेने पाहत आहे. जनतेला न्याय देताल हिच अपेक्षा..!
जनतेला न्याय मिळेल - घाडगे
गेल्या काही दिवसापासून पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांची सुत्रे परीक्षा विधीन आयपीएस अधिकारी बी चंद्रकांत रेड्डी यांनी हाती घेतली होती.पुन्हा विलास पुजारी यांना मुळ पदाची सुत्रे हाती देण्यात आली. जनतेचे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत. अनेक गुन्हेचा तपास करणे बाकी आहे. तपासातून सत्यता बाहेर आणायची आहे. पुजारी साहेब यांनी पदभार स्विकारला असल्याने निश्चितच जनतेला न्याय मिळेल.
कानिफ घाडगे,
भायगाव
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...