कोरोनाने घेतला पत्रकाराचा बळी - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

शनिवार, १७ एप्रिल, २०२१

कोरोनाने घेतला पत्रकाराचा बळी

पत्रकार देठेचा कोरोनाने मृत्यू
 
बोरी फाटा / जलभूमी वृत्तसेवा 
 
राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील खुडसरगाव येथील पत्रकार आपल्या लेखणीच्या जोरावर परिसरासह जिल्ह्यात सर्वांच्या परिचित असणारे कैलास देठे वय - ४५ यांचे कोरोना ने निधन झाल्याने पत्रकारिता क्षेत्रात मोठी शोककळा पसरली आहे. 
 


पत्रकारिता करत असताना त्यांना कोरोना ची लागण झाली. पुढील उपचारासाठी त्यांना अहमदनगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान गुरुवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी परिसरात समजतात सर्वांनी हळहळ व्यक्त केली. त्यांच्या पश्चात वृद्ध आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, पुतणे असा मोठा परिवार आहे. पत्रकार भाऊ कदम, पत्रकार वसंतराव आढाव, पत्रकार नारायण चोरमले, पत्रकार दीपक दातीर, पत्रकार संतोष टेमक यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...