रुपेशराजे बेंद्रे यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

मंगळवार, २० एप्रिल, २०२१

रुपेशराजे बेंद्रे यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी

रुग्नाना फळे व अंडे वाटून वाढदिवस केला साजरा
 
नितिन भोंडवे 
पाटोदा / जलभूमी वृत्तसेवा 
 
कोरोनाच्या दुसऱ्या भयंकर लाटेत परिसरातील व ओळखीचे दररोज कोणी ना कोणी दगावत आहे. 
 

देशावर राज्यावर मोठे संकट आले असताना गोरगरीब जनतेला उपासमारीची वेळ आलेली असून अनेक लोक संकटात सापडले असताना शरदचंद्रजी पवार यांच्या विचारधारेवर चालणारे मराठवाडा रहिवासी संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रुपेशराजे बेंद्रे यांनी समाजाचे काहीतरी देणे लागतो म्हणून सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून वाढदिवसावर वेर्थ खर्च न करता पाटोदा तालुक्यातील कोरोना सेंटर मधील रुग्णांना फळे व अंड्याचे वाटप करुन वाढदिवस साजरा केला. 
 
आपल्या भागातील लोक संकटात सापडले असताना आपण वाढदिवस का साजरा करायचा म्हणून मराठवाडा रहिवासी संघाचे संस्थापक अध्यक्ष रुपेशराजे बेंद्रे पाटील यांनी वाढदिवस यापद्धतीने साजरा केला. यावेळी नानासाहेब कवठेकर, श्रीराम तुपे, निलेश बेंद्रे पाटील, बालाजी कवठेकर, श्रीकांत कुडके आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...