रानडुक्करचा शेतकर्‍यांवर प्राणघातक हल्ला - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

शनिवार, १७ एप्रिल, २०२१

रानडुक्करचा शेतकर्‍यांवर प्राणघातक हल्ला

कुरणपूर येथील गणेश चिंधे जखमी
 
भारत थोरात 
बेलापूर /जलभूमी वृत्तसेवा 
 
प्रवरा नदीपात्र परिसरात बिबट्या धुमाकूळ सध्या सुरू असतानाच श्रीरामपूर तालुक्यातील कुरणपूर येथील युवक गणेश उमाकांत चिंधे (वय २५) आपल्या शेतात पाणी भरत असताना रानडूकराने चावा घेवून धडक दिल्याने तरूण जखमी झाला असून ही घटना गुरूवारी सायंकाळी सुमारास कुरणपूर येथे घडली.
 

कुरणपूर - रानडुक्कराच्या धडकेत गंभीर जखमी झालेला गणेश चिंधे हा तरूण.... 
( छाया - जलभूमी सेवा, बेलापूर )
 
त्यास पुढील उपचारासाठी नगर येथे दाखल करण्यात आले.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वनाधिकारी बी.एस. गाढे, वनपाल विकास पवार, लांडे हजर झाले होते. त्यांनी कोणताही विलंब न करता पुढील उपचारासाठी जखमी तरूणाला अहमदनगर येथील एका खाथगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. याआधीच परिसरात बिबट्या बरोबरच रानडूकरांची संंख्या मोठ्या प्रमाणात असून सध्या प्रवरा नदीला पाणी भरपूर असल्याने मका, उस हे पीक मोठ्या प्रमाणात असून रानडूकरांना व बिबट्यांचा वावर या परिसरात आहे. 
 
कुरणपूर, फत्त्याबाद, मांडवे, कडीत, उक्कलगाव आदी सह गावात रानडुक्कर मका, ऊसाच्या पिकांचे मोठे नुकसान करत असल्याची माहिती शेतकर्‍यांनी दिली. नदीकाठ परिसरात बिबट्यानंतर रानडुक्कराचा धुमाकूळ सुरुच झाला असून तरूणाच्या हाताला जखमा झाल्याने शेतकर्‍यांच्या मनात आणखी भीती निर्माण झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...