विवेकानंद नर्सिंग होममध्ये कोविड सेंटर उभे करा
भाऊ कदम
बोरीफाटा / जलभूमी वृत्तसेवा
राहुरी सहकारी साखर कारखान्याची सत्ता खासदार सुजय विखे यांच्या ताब्यात असलेल्या विवेकानंद नर्सिंग होम मध्ये आहे. या कारखान्याच्या माध्यमातून साधे कोरोना सेंटर रूग्णांच्या सेवेसाठी उभे करता आले नाही. ही राहुरी तालुक्याच्या जनतेसाठी चीड आणणारी गोष्ट आहे. कोविड सेंटर नसणे डॉ. सुजय विखे पाटील व संचालक मंडळाचे अपयश असे स्पष्ट मत अचूत धुमाळ यांनी व्यक्त केले.
राहुरी सहकारी साखर कारखाना सभासदांच्या पैशातून विवेकानंद नर्सिंग होम उभे केले आहे. या संस्थेमध्ये सर्व सोई उपलब्ध असताना तिथे यांना 50 बेडची रुग्णांसाठी सोय उपलब्ध करता आली नाही. राहुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना सदृश्य परिस्थिती असताना याकडे दुर्लक्ष केले असल्याचे चित्र पहावयास मिळते.
कारखान्यावर इंजिनिअरिंग कॉलेज, जुने पब्लिक स्कूल, मोठी इमारत अद्यावत असताना देखील कोरोना पेशंटची सोय उपलब्ध झाली असती. तालुक्यातील जनता आज बेड मिळत नाही म्हणून बाहेरच्या तालुका जाऊन आम्हाला बेड व ऑक्सिजनची उपलब्धता द्या . अशी विनवणी करताना दिसत असल्याची वाईट परिस्थिती रुग्णांची दिसत आहे.
तरी खासदार सुजय विखे पाटील व संचालक मंडळ यांना राहुरी तालुक्यातील जनते विषयी काही घेणे देणे नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्यासाठी नर्सिंग होम येथे कोरोना सेंटर उभे करण्याची आवश्यकता असल्याने याकामी जिल्हाधिकारी यांनी तातडीने लक्ष घालून नर्सिंग होम ताब्यात घेऊन तालुक्यातील कोरोना पेशंटची व्यवस्था होईल, अशा पद्धतीने नियोजन करावे असे तालुक्यातील जनता व अमृत धुमाळ यांनी मागणी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...