कोरोना उपाययोजनेत ग्रामपंचायत प्रशासन कोमात, सेवा भावी संस्था जोमात - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

बुधवार, २८ एप्रिल, २०२१

कोरोना उपाययोजनेत ग्रामपंचायत प्रशासन कोमात, सेवा भावी संस्था जोमात

विजय कापरे तर्फे भातकुडगांव गटात जंतू नाशक फवारणी
 
बाळासाहेब जाधव
शेवगांव - जलभूमी वृत्तसेवा
 
शेवगांव तालुक्यातील सामनगाव येथील विजय कापरे यांनी सेवा भावी वृत्तीने तालुक्यातील जिल्हा परिषद भातकुडगांव गटातील अनेक गावात व परिसरात कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्याकरीता सॅनिटायझरची फवारनी करण्यात आली. कोरोना उपाययोजनेत ग्रामपंचायत प्रशासन कोमात, सेवा भावी संस्था जोमात अशी परिस्थिती अनेक गावात पहावयास मिळते. सध्या कोरोना महामारीमुळे जनता हैराण झाली आहे. प्रत्येक गावात रुग्ण आढळून येत आहे.
 
महाराष्ट्र शासनाने कोरोनाला पायबंद घालण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला सुचना देवून अधिकार दिले आहे. ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. काही ग्रामपंचायतीने कागदी घोडे नाचविण्यात पटाईत असल्याने त्यातच राजकीय हित डोळ्यासमोर ठेवून समित्या स्थापन केल्या. आपल्या समितीत आपल्या मर्जीतील लोकांची वर्णी लावली. सध्याच्या महाभयंकर परिस्थितीत या समित्या गेल्या कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मनापासून काम केल्यास निश्चित गावपातळीवर कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाला मदत होईल. जर ग्रामपंचायत प्रशासनाने कागदी घोडे नाचून शासनाच्या दिवसा ढवळ्या धुळ फेक केली जात असेल तर गावाचा विकास होण्याऐवजी भकासाकडे वाटचाल झाल्याशिवाय राहणार नाही.
 
पदे ही मिरवायासाठी नसतात, तर जनसेवा करण्यासाठी असतात. मात्र काही ग्रामपंचायतीमध्ये कागदोपत्री समित्या स्थापन केल्या असल्याने समितीच्या सदस्यांनाच माहीत नसते आपण समिती मध्ये आहोत. या समित्या म्हणजे आंधळ दळतय, कुत्र पिठ खातय अशी अवस्था पाहावयास मिळते. ग्रामपंचायतीचा सर्व गावगाडा फक्त सरपंच व ग्रामसेवक चालवताना दिसतात. उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध समित्यांचे पदाधिकारी फक्त नावालाच असतात. ज्यावेळी विविध समित्या अस्थितवात येवून त्यांचा अधिकार त्यांना देवून कामकाज केले जाईल त्या दिवसापासून गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही.
 
कोरोना महामारीमध्ये जंतू नाशक फवारणी करणे ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. मात्र विजय कापरे सारखे सेवाभावी काम करणारे गावात येतात. दुसऱ्या गावाची काळजी घेतात. इथ मात्र गावाची सुरक्षा घेण्याची जबाबदारी ज्यांच्या हातात लोकशाहीनी दिली ते मात्र दुसऱ्याच्या कामात फोटो काढून सोशल मिडीयावर व्हायरल करून आम्ही गावाची किती काळजी घेतो यांच्या मध्ये धन्यता मानतात.
 
गावपातळीवर कोरोनाला आळा घालण्यासाठी उपाययोजना आठवून जनजागृती केली पाहिजे. गावातील सर्वानी मास्क वापरावे. वेळो वेळी स्वच्छ हात धुवावे. विनाकारन फिरणे टाळावे. तरच कोरोना होण्यापासून दुर राहता येईल.अशा सुचना घरोघरी जाऊन दिल्या पाहिजे. मात्र याबाबीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने खेडोपाडी कोरोनाने शिरकाव केला आहे. मग याला जबाबदार कोण ? असा सवाल विचारला जात आहे. सध्या प्रत्येकाला स्वतः चा जीव वाचविणे फार महत्त्वाचे आहे. कोरोना संदर्भात कुठलेही राजकारण न करता सर्वानी एकत्र येवून कोरोनोशी सामना केला पाहिजे.
 
थंडी, ताप, सर्दी चे काही लक्षणे दिसल्यास ताबडतोब जवळच्या ग्रामीन रूग्णालयात संपर्क साधून वेळेत उपचार करून घेतले पाहिजे. भातकुडगांव गटात फवारणीसाठी मयुर म्हस्के, सुधीर कापरे, सुभाष देवढे, सुभाष कोठे यांनी परिश्रम घेतलेे. सुरक्षित रहा, मास्क वापरा, स्वतः ची व कुटुंबाची काळजी घ्या. हा संदेश यावेळी देण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...