तमाशासम्राट रघुवीर खेडकर यांच्या फडाला लाखाची मदत - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

सोमवार, २६ एप्रिल, २०२१

तमाशासम्राट रघुवीर खेडकर यांच्या फडाला लाखाची मदत

शिर्डीच्या साईबाबा चा महाप्रसाद मिळाला - खेडकर
 
तुषार महाजन 
शिर्डी / जलभूमी वृत्तसेवा 
 
साईबाबांच्या शिर्डी गावातुन तमाशा कलावंत जगला पाहीजे, म्हणून शिर्डीमध्ये गेल्या ७५ वर्षापासून रामनवमीची परंपरा जपणारे रघुवीर खेडकर यांचा तमाशा फडातील कलावंत व कामगारांना मदत म्हणून रु. १ लाख रोख स्वरुपात देण्यात आले. श्री साईबाबा हयात असताना स्वतः कलावंताची कदर करायचे व मानधन द्यायचे. 
 
 
श्रीरामनवमी यात्रा कोरोणामुळे यावर्षी देखील रद्द झाली होती. त्यामुळे श्रीरामनवमी यात्रा कमिटीचे अध्यक्ष केशव आण्णा गायके पा. यांचे वस्तीवर छोटीशी बैठक घेऊन त्यामध्ये रघुवीर खेडकर ज्यांनी गेल्या ४/५ वर्षापासून कधीही मानधनाबाबद रक्कम ठरवित नाही व जे द्याल तो बाबांचा प्रसाद समजुन स्विकारील अशी भुमिका दरवर्षी घेणारे तसेच निस्सिम साईभक्त असल्याने तसेच नुकतेच प्रसिद्धी माध्यमातून व्यथा व हालअपेष्टा सांगितल्या. 
 
सर्वांच्या सहमतीने निर्णय घेण्यात आला की, रामनवमी यात्रेतील मागिल २ वर्षापूर्वीची शिल्लक रकमेतुन रु. १ लाख देण्याचे ठरले. साईबाबांच्या मंदीरालगत गेट नं. ४ जवळ कळसा समोर ही मदत देण्यात आली. यावेळी रघुवीर खेडकर यांनी ही रक्कम नसुन श्री साईबाबांचा प्रसाद आहे, यामुळे आमचे १३० लोकांचे कुटूंबाला मोठा हातभार मिळाला. असे बोलताना भावनिक होवुन डोळे भरुन आले. 
 
बाबांच्या कळसासमोर नतमस्तक झाले. याप्रसंगी कोरोणामुळे व नियमांचे पालन व्हावे, यासाठी प्रातिनिधीक स्वरुपात फक्त यात्रा कमिटीचे अध्यक्ष केशव आण्णा गायके, शिवसेना नेते कमलाकर कोते, नगराध्यक्ष शिवाजीराजे गोंदकर, प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते, भाजपा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर आबा गोंदकर, गौतम बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब आप्पा कोते, माजी उपनगराध्यक्ष अभयभैया शेळके, माजी उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर, खजिनदार बाळासाहेब लुटे व प्रमोद गोंदकर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...