कोविड केअर सेंटर सुरू करा - राष्ट्रवादीची मागणी - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

शुक्रवार, २३ एप्रिल, २०२१

कोविड केअर सेंटर सुरू करा - राष्ट्रवादीची मागणी

अनिता वानखेडे यांनी केली तहसिलदाराकडे लेखी मागणी
 
किरण काळे 
पैठण / जलभूमी वृत्तसेवा 
 
पैठण तालुक्यातील विहामंडवा येथे कोरोना रुग्णांची लक्षणीय वाढ होत आहे. रूग्णांना कोविड केअर सेंटर नसल्याने त्यांची मोठी हेळसांड होतांना दिसुन येत आहे. याठिकाणी कोरोनाचा प्रसार होण्यास धोका निर्माण होऊ शकतो. ही भयावह परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याकरिता विहामांडवा येथे तात्काळ कोविड केअर सेंटर ची उभारणी करण्यात यावी. 
 
 
पैठण - विहामांडवा येथे कोविड केअर सेंटर सुरू करावे. या मागणीचे निवेदन तहसिलदार चंद्रकांत  शेळके यांना देतांना राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षा  अनिता वानखडे. 
( छाया - किरण काळे, पैठण )
 
अशी मागणी राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यक्षा अनिता वानखडे यांनी निवेदनाव्दारे तहसिलदार यांच्याकडे केली आहे. कोरोना झालेल्या रूग्णांना पाचोड किंवा पैठण येथिल कोविड केअर सेंटरला दाखल करावे लागते..विहामांडवा हे जि.प.सर्कलचे मोठे गाव असुन लोकसंख्या देखिल मोठ्या प्रमाणावर आहे.परिसरातील गावांचा सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासनाने विहामांडवा येथे कोविड केअर सेंटर त्वरित उभारावे या आशयाचे निवेदन पैठण तहसिलदार चंद्रकांत शेळके यांना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पैठण तालुकाध्यक्षा अनिता वानखडे यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...