प्रवासी वाहतूक बंद असल्याने घरोघरी जाऊन लसीकरण करावे - पवळे - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

शुक्रवार, २३ एप्रिल, २०२१

प्रवासी वाहतूक बंद असल्याने घरोघरी जाऊन लसीकरण करावे - पवळे

कोरोनाला पळवण्यासाठी न घाबरता कोरोना प्रतिबंधक लस घ्या
 
अहमदनगर / जलभूमी वृत्तसेवा 
 
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची तिव्रता अत्यंत भयंकर असुन या लाटेमध्ये अनेकांनी आपला जीव गमावला असुन यामध्ये अनेकजन जीवाची पर्वा न करता या लढ्यामध्ये जीवाची बाजी लावुन यथाशक्ती योगदान देताना दिसत आहेत. आरोग्य केंद्रामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या ठिकाणी नागरिकांची होणारी गर्दी धोकादायक असुन खेड्यापाड्यातील नागरिकांना आरोग्य केंद्रात रांगेत उभे रहावे लागणे, कडक लॉकडाऊनमुळे त्यांचा येण्या जाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. 
 

दि. १ मे पासुन १८ वयोगटाच्या पुढील व्यक्तींना लसीकरण सुरु झाल्यास मोठी गर्दी आरोग्य केंद्रामध्ये होईल. यासाठी आरोग्य विभागाने उपकेंद्रांच्या माध्यमातुन वाडीवस्तीवर नागरिकांच्या याद्या करुन सोशल डिस्टंसिंग पाळत रुग्णवाहीकेच्या माध्यमातुन लसीकरणाचे डोस दिल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. पुढचा येणारा धोका यामुळे टळेल. त्याचबरोबर नागरिकांनी आलेल्या संकटाला स्वत:ला सुरक्षित ठेवुन सामोरे गेले पाहीजे. 
 
परिस्थितीचे गांभिर्य पाहुन प्रत्येकाने या कोरोनाच्या लढ्यात प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करुन घेतलेच पाहीजे व इतरांनाही प्रोत्साहीत करुन कोरोनाचा कहर थांबवण्यासाठी नागरिकांनी लसीकरणाची ढाल पुढे केल्यास कोरोसोबतची लढाई आपण नक्कीच जिंकणार असुन याविषयी आपण आरोग्य अधिकार्‍यांशी संपर्क साधणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी दैनिक जलभूमी शी बोलताना सांगितले.
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...