पालकमंत्री हसन मुश्रीफ दोन दिवसाच्या जिल्हा दौऱ्यावर - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

गुरुवार, २९ एप्रिल, २०२१

पालकमंत्री हसन मुश्रीफ दोन दिवसाच्या जिल्हा दौऱ्यावर

शुक्रवारी नेवासा दौऱ्यावर


संदिप दरंदले

सोनई / जलभूमी वृत्तसेवा


महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा अहमदनगर जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.



शुक्रवार दि. 30 रोजी सकाळी 8 वाजता पुणे येथून शासकीय मोटारीने अहमदनगर मार्गे श्रीरामपूरकडे प्रयाण. सकाळी 11 ते 12 वाजता श्रीरामपूर तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती, लसीकरण व उपाययोजना बाबत आढावा बैठक स्थळ- शासकीय विश्रामगृह, श्रीरामपूर. दुपारी 12 वाजता श्रीरामपूर येथून मोटारीने नेवासाकडे प्रयाण. 


दुपारी 12.45 ते 1.45 वाजता नेवासा तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती, लसीकरण व उपाययोजना बाबत आढावा बैठक स्थळ- पंचायत समिती सभागृह, नेवासा. दुपारी 1.45 वाजता नेवासा येथून अहमदनगरकडे प्रयाण. दुपारी 2.45 ते 4 वाजता शासकीय विश्रामगृह, अहमदनगर येथे राखीव.


दुपारी 4 ते 5 वाजता अहमदनगर जिल्हयातील कोरोना सद्यस्थिती, लसीकरण व उपाययोजना बाबत आढावा बैठक स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर. दुपारी 5 ते 5.45 वाजता पत्रकार परिषद स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर. सायंकाळी 6 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन, राखीव व मुक्काम.


शनिवार, दि. 1 मे रोजी सकाळी 7.45 वाजता शासकीय विश्रामगृह येथे राखीव. सकाळी 8 वाजता 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त झेंडावंदन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर. सकाळी 8.15 वाजता ग्रामविकास विभागाकडून 14 व्या वित्त आयोग निधीतून 45 रग्णवाहिका जिल्हा परिषदेस कोविड-19 उपाययोजनेसाठी हस्तांतरण. 


सकाळी 8.30 ते 10 शासकीय मोटारीने अहमदनगर येथून शिर्डी विमानतळ, काकडीकडे प्रयाण व आगमन. सकाळी 10.15 वाजता खाजगी विमानाने शिर्डी येथून कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...