रुग्णांच्या मनोधैर्यासाठी 'झुबा डान्स' संकल्पना सुरू - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

बुधवार, २८ एप्रिल, २०२१

रुग्णांच्या मनोधैर्यासाठी 'झुबा डान्स' संकल्पना सुरू

कोविड केंद्रातील रुग्णांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी डान्स उपक्रम सुरू
 
कर्जत / जलभूमी वृत्तसेवा 
 
गेल्या २०० दिवसांच्यावर सर्व सामाजिक संघटनेकडून स्वच्छता आणि वृक्षारोपण बरोबर कोविड केंद्राच्या स्वच्छतेसह आता कोविड केंद्रातील रुग्णांसाठी त्यांचे मनोधैर्य वाढवून भीती घालविण्यासाठी 'झुबा डान्स' संकल्पना सुरू करून तरूण आणि वयोवृद्ध रुग्ण तणाव विसरून ठेका धरताना दिसत आहेत. 
 
 
कर्जत येथील गायकरवाडी आणि उपजिल्हा रुग्णालय येथील कोविड केंद्र आहे. मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत. येणारा प्रत्येकजण तणावग्रस्त दिसत असल्याने तेथे स्वच्छता करण्यासाठी जाणाऱ्या सर्व सामाजिक संघटनेच्या स्वयंसेवकांच्या ही बाब लक्षात आल्याने प्रशिक्षक प्रा. संदीप पांढरकर यांच्याशी चर्चा करून कोविडच्या रुग्णांना झुबा डान्स करण्यासाठी परावृत्त केले. अनेक रुग्ण स्वयंस्फूर्तीने या उपक्रमाला प्रतिसाद देऊन तरुण,महिला आणि वयोवृद्धांनी देखील ठेका धरून आपला तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला. 
 
सर्व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात असताना कोरोना रुग्णांनासाठी झुबा डान्सचा उपक्रम घेऊन निश्चित रुग्णांना मानसिक आधार मिळेल. अशी भावना असल्याचे सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...